अकोला : उद्‍ध्वस्त खरीपावर माेहाेर; शेतकऱ्यांना मिळणार सवलती

९९० गावांची पैसेवारी ४७ पैसे असल्याने शेतकऱ्यांना दिलासा
akola
akolaSakal

अकोला : यावर्षी झालेला ढगफूटी सदृष्य पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असल्याने जिल्ह्यात खरीप पिकांच्या अंतिम पैसेवारीनंतर ४७ पैसे जाहीर करण्यात आली आहे. खरीपातील लागवडी याेग्य ९९० गावांचा यात समावेश आहे. खरीप पिकांची पैसेवारी ४७ पैसे जाहीर करण्यात आल्याने शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सवलतींचा मार्ग माेकळा झाला आहे. परंतु त्यासाठी शासन निर्णयाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ( Farmers will get concession in loss of crops in akola )

जिल्हा प्रशासन दरवर्षी सप्टेंबर महिन्यात खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी जाहीर करते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये सुधारित नजरअंदाज तर डिसेंबर महिन्याच्या ३१ तारखेला अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येते. या पैसेवारीनंतर शासन दुष्काळाची परिसीमा ठरवत असते. ५० टक्क्यांच्या खाली पैसेवारी निघाल्यास पीक परिस्थिती गंभीर व ५० टक्क्यांच्यावर निघाल्यास पीक परिस्थिती उत्तम हे पैसेवारीचे समीकरण आहे.जिल्ह्यात १०१२ गावे असून, त्यातील ९९० गावे खरीप पिकांची लागवडी याेग्य आहेत. त्यामुळे यंदा पाहणी करण्यात आलेल्या ९९० गावांमधील अंतिम पैसेवारी सरासरी ४७ पैसे जाहीर करण्यात आल्यामुळे उद्‍धवस्त खरीपावर मोहर लागली असून शेतकऱ्यांना विविध सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

akola
अकोला : जिल्ह्यात ओमायक्रॉन निर्बंध; सोहळ्यांत ५० जणांच्या उपस्थितीची अट

गावांना लागू हाेणाऱ्या उपाययाेजना

  1. शेतकऱ्यांना जमीन महसूलात सूट

  2. सहकारी कर्जाचे पुनर्गठन

  3. शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती

  4. कृषी पंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के इतकी सूट

  5. शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी

  6. राेहयाेंतर्गत कामांच्या निकषांत काही प्रमाणात शिथीलता

  7. आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅंकर्सचा वापर

  8. शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जाेडणी खंडित न करणे

  9. यापूर्वी ५० पैशांवर होती पैसेवारी

akola
नाशिक शहर बससेवेत दरवाढ... | CITILINK

खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ३० सप्टेंबर रोजी सरासरी ५९ पैसे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर सुधारित नजरअंदाज पैसेवारी सुद्धा ५३ पैसे जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना सवलती मिळणयाची शक्यता कमी होती, परंतु आता जिल्हा प्रशासनाने अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com