तेल्हारा : मुलाला वाचविताना वडिलांचाही बुडून मृत्यू

बाप-लेकाच्या मृत्यूने परिसर हादरला; बैल धुताना पडला मुलगा
father also drowned while rescuing the child akola update
father also drowned while rescuing the child akola updatesakal

तेल्हारा : तालुक्यातील उकळी बाजार येथील बारा वर्षीय मुलगा बैलाला धुण्यासाठी नाल्यात गेला असता खड्ड्यात पाय घसरून पडल्यामुळे पाण्यात बुडत असल्याचे बघून त्याला वाचविण्यासाठी गेलेले त्याच्या वडिलांचा देखील पाण्यात बुडाल्याने बुडून अंत झाला. घटना रविवार, ता. ७ मोर्च रोजी घडली.

प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील उकळी बाजार येथील रहिवासी गजानन मोहनलाल शर्मा यांचा बारा वर्षीय मुलगा कन्हैया गजानन शर्मा हा बैल धुण्यासाठी कालव्याच्या टेलजवळ असणाऱ्या नाल्यात गेला होता. तेथे बैल धुताना त्याचा पाय घसरला. तोलजाऊन तो खड्ड्यात पडला. मुलगा पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी त्याचे वडील गजानन मोहनलाल शर्मा यांनी पाण्यात उडी घेतली. परंतु दोघांनाही पोहणे येत नसल्यामुळे व पाणी डोक्याच्या वर असल्याकारणाने पिता-पुत्रांच्या पाण्यात बुडून करून अंत झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक धामोडे यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. बाप-लेकाचे मृतदेह पोलिसांनी उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालय येथे पाठविले आहे. घटनेमुळे उकळी बाजार सह तालुक्‍यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com