esakal | औषधाच्या नावावर १४ लाखाने फसवणूक, गुन्हा दाखल

बोलून बातमी शोधा

औषधाच्या नावावर १४ लाखाने फसवणूक, गुन्हा दाखल
औषधाच्या नावावर १४ लाखाने फसवणूक, गुन्हा दाखल
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : शहरातील एका हेल्थकेअर चालवणाऱ्या व्यावसायिकाची शासकीय कंत्राटदार असल्याचे सांगून १४ लाख ४१ हजार रुपयांनी फसवणूक करणाऱ्या आरोपी विरोधात खदान पोलिस स्टेशन येथे गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी खदान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

फिर्यादी अविनाश नेमीचंद चव्हाण (३७ रा. रिंगरोड समता कॉलनी) हा इव्हीए हेल्थकेअर या व्यवसायातून घाऊक व किरकोळ औषधाची विक्री करतो. यादरम्यान फिर्यादीची आरोपी अंकूर अशोक मोहोड (३२, रा. हिंगणा रोड बलोदे लेआऊट) याच्याशी ओळख झाली. सदर आरोपीने शासकीय कंत्राटदार असल्याचे सांगून धुळे नगरपरिषदेची खोटे टेंडर दिले. त्यासाठी औषधापोटी फिर्यादीस तीन लाख रुपयांची रक्कम भरण्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा सात लाख ७० हजार रुपये पुन्हा फिर्यादीने जमा केले. फिर्यादीने आरोपीला याप्रकारे १४ लाख ४१ हजार १०१ रुपये पाठवले. पेमेंट केल्यानंतरही आरोपीने औषधांची डिलिव्हरी केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादीने खदान पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा केला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला ता.२ मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

संपादन - विवेक मेतकर