विसर्जनासाठी गणेश घाट सज्ज, वैयक्तिक विसर्जनालाच परवानगी

मनोज भिवगडे
Monday, 31 August 2020

दहा दिवस गणेशाची मनोभावे पूजा केल्यानंतर आता बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. दोन दिवसांनंतर म्हणजे मंगळवार, ता. १ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीला गणेश विसर्जन होणार आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे तयारी करण्यात आली आहे. वैयक्तिक गणेश मूर्ती विसर्जनासाठी गणेश घाटांवर कुंड तयार करण्यात आले आहे. मिरवणुकीने विसर्जनाला मात्र परवानगी देण्यात आली नाही.

अकोला : दहा दिवस गणेशाची मनोभावे पूजा केल्यानंतर आता बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. दोन दिवसांनंतर म्हणजे मंगळवार, ता. १ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीला गणेश विसर्जन होणार आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे तयारी करण्यात आली आहे. वैयक्तिक गणेश मूर्ती विसर्जनासाठी गणेश घाटांवर कुंड तयार करण्यात आले आहे. मिरवणुकीने विसर्जनाला मात्र परवानगी देण्यात आली नाही.

दरवर्षी प्रमाणे गणेश विसर्जनासाठी महापालिकेतर्फे मोर्णा नदीच्या काठावर गणेश कुंडांची निर्मिती करण्यात आली आहे. यावर्षी कोरोना संकटामुळे गणेश विसर्जन मिरवणुलीचा परवागनी देण्यात आली नाही. मात्र नागरिकांना त्यांच्या घरी स्थापन केलेल्या गणेश मूर्तीचे विसर्जन करता यावे यासाठी मनपातर्फे तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी कोतवाली पोलिस स्टेशन जवळी गणेश घाटावर सात कुंड तयार करण्यात आले आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

हरिहर पेठ येथील गणेश घाटावर जुने शहरातील नागरिकांकरिता विसर्जनासाठी कुंड तयार करण्यात आले आहे. निमवाडी येथेही मोर्णा नदीच्या काठावर विसर्जनाची तयारी करण्यात आली.

याशिवाय हिंगणा येथे मनपातर्फे मोर्णा नदीच्या काठावर गणेश कुंड तयार करण्यात आला. याशिवाय गणेश विसर्जनासाठी नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून प्रभाग निहाय गणेश विसर्जन कुंड तयार करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते.

त्याला नगरसेवक व स्वयंसेवी संस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कौलखेड परिसरात नगरसेवक विनोद मापारी यांच्यातर्फे दरवर्षी प्रमाणे जुने खेतान नगर येथील छत्रपती उद्यानात गणेश विर्सजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. मलकापूरमध्ये ग्रामपंचायत भवनजवळ नगरसेवक मंगेश काळे यांनी विसर्जनाची व्यवस्था केली आहे. खडकी गणेश घाट येथील विसर्जन करता येणार आहे.

तापडिया नगरात नगरसेविका गितांजली शेगोकार, हरीश काळे आणि सामाजिक कार्यकर्ते सागर शेगोकार यांच्यातर्फे भारत विद्यालयाजवळील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर कुंड तयार करण्यात आला आहे. सातव चौकात नगरसेविका ॲड. धनश्री देव यांच्यातर्फे विसर्जनासाठी कुंड तयार करण्यात आला.

देशमुख फैलमधील शिवाजी पार्कमध्ये विसर्जन करता येणार आहे. जुने शहरात रेणूकानगर परिसरात बाभळेश्वर मंदिर परिसर, टिकार भवन, वानखेडे नगर जवळ येथे विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तुकाराम चौकातही सामाजिक कार्यकर्त्यांकडून विसर्जनासाठी कुंड तयार करण्यात आले.
 
मनपाने दिले कंत्राट
महानगरपालिकेने यावर्षी गणेश विसर्जनासाठी कुंड तयार करणे व परिसरात नागरिकांसाठी सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी कंत्राटदार नियुक्त केले आहे. कंत्राटदार अग्रवाल यांच्यामार्फत हरिहरपेठ आणि कोतवाली गणेश घाटावर कुंड निर्माण करण्यात आले. निमवाडीतील गणेश घाट कंत्राटदार सलुजा यांच्यामार्फत करण्यात आला आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganesh Ghat ready for Akola immersion, individual immersion allowed