esakal | हिवरखेड : कोरोना रुग्णाच्या संपर्कातील पाच व्यक्तींना अकोला येथे पाठविले

बोलून बातमी शोधा

Hivarkhed: Five persons in contact with Corona patient were sent to Akola

कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातलेले असतानाही मागील अनेक महिन्यांपासून आजपर्यंत सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांनी "कोरोना को हराना है" हे ध्येय कायम ठेवत कोरोनाला दूर ठेवलेल्या हिवरखेड येथून 5 जणांना कोरोना पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आल्याने आरोग्य विभागाने अकोला येथे पाठविल्यामुळे हिवरखेड वासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.

हिवरखेड : कोरोना रुग्णाच्या संपर्कातील पाच व्यक्तींना अकोला येथे पाठविले
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेेवा

हिवरखेड (जि.अकोला) : कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातलेले असतानाही मागील अनेक महिन्यांपासून आजपर्यंत सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांनी "कोरोना को हराना है" हे ध्येय कायम ठेवत कोरोनाला दूर ठेवलेल्या हिवरखेड येथून 5 जणांना कोरोना पॉझिटिव रुग्णाच्या संपर्कात आल्याने आरोग्य विभागाने अकोला येथे पाठविल्यामुळे हिवरखेड वासीयांच्या चिंतेत भर पडली आहे.


सविस्तर असे की दोन दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील निवाना या गावातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाला होता. परंतु त्याचा कोरोना रिपोर्ट हाती येण्यापूर्वीच त्याची पत्नी हिवरखेड येथे आपल्या माहेरी दीड महिन्यांच्या लहान मुलीसह आलेली होती.

पतीला कोरोना चे निदान होण्यापूर्वी प्रकृती बरोबर नसल्यामुळे शेगाव येथील रुग्णालयात भरती करण्यात आले होते. एकूण पाच जण त्यांची प्रकृती पाहण्यासाठी शेगाव येथे जाऊन आले होते. निवाना येथील त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध लावताना आणि त्या रुग्णास विचारणा केल्यानंतर पत्नी व लहान मुलगी हिवरखेड येथे आलेले असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. आणि एकूण पाच जण त्यांच्या संपर्कात आलेले असल्याची माहिती मिळाल्यामुळे दि 29 जून सोमवार रोजी हिवरखेड येथील वैद्यकीय अधिकारी डॉ वैशाली ठाकरे यांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. तरीही कोरोना बाधित व्यक्तीच्या  संपर्कात आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने निवाना येथील पॉझिटिव्ह रुग्णाची पत्नी (वय 27), लहान मुलगी (वय दीड महिने), सासू (वय 47) पत्नीची आजी, पत्नीचा भाऊ अशा एकूण 5 जणांना अकोला येथे पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कॉरेनटाईन सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे.  तेथून त्यांचे स्वॅब नमुने घेऊन कोरोना तपासणी सुद्धा केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 


या प्रकारामुळे संपूर्ण हिवरखेड नगरीत भीतीचे वातावरण पसरले असून हिवरखेड वासियांनी आता घराबाहेर पडण्यापूर्वी सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे झाले आहे. परंतु सध्या स्थितीत हिवरखेड येथे एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसल्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.