विवाहितेला जाळणाऱ्या पती, जेठाला जन्मठेप

माणकी येथील विवाहिता मृत्यू प्रकरणात न्यायालयाचा निर्वाळा
Husband burns wife sentenced life imprisonment akola
Husband burns wife sentenced life imprisonment akolasakal

अकोला : बाळापूर तालुक्यातील माणकी येथील विवाहीतेच्या मृत्यू प्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यनशिवराज खोब्रागडे यांनी पती उमेश महादेव वरणकार व जेठ गणेश महादेव वरणकार यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणात मृत विवाहिता सुवर्णा उमेश वरणकारची मृत्यूपूर्व जबाणी महत्त्वाची ठरली. मृतक सुवर्णा उमेश वरणकारने दिलेल्या मृत्यूपूर्व जबाणी नुसार ता. १२ सप्टेंबर २०१२ रोजी सकाळी ६ वाजता दरम्यान राहत्या घरी नवरा उमेश महादेव वरणकार व जेठ गणेश महादेव वरणकार यांनी तिच्या सोबत शिविगाळ, मारपिट करून अंगावर घासलेट टाकुण जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

लग्न झालेपासून तिचा नवरा चारीत्र्यावर संशय घेवून फारकत देण्याचे बाबतीत नेहमी भांडण करीत होता. जेठ हा सुध्दा तिच्या सोबत नेहमी भांडण करीत होता व फारकत दे असे म्हणून भांडण करीत होता. तिने स्वत:हून जाळून घेतलेले नाही, असे तिच्या मृत्यूपूर्व जबाणीत नमुद होते. त्यावरून तत्कालीन पोलिस निरिक्षक सुनील सोळंके यांनी दोघांविरुध्द कलम ३०२, ४९८-अ, ३२३, ५०४,३४ भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल केला व स्वत:हा प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायप्रविष्ठ केले. सदरहू प्रकरणामध्ये सरकार पक्षाने गुन्हा सिध्द होण्याकरिता मृतकाचे वडील, तत्कालीन नायब तहसीलदार, डॉक्टर, तपास अधिकाऱ्यांसह एकूण साथ साक्षीदार तपासले.

सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा दिली. याशिवाय प्रत्येकी पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील राजेश आकोटकर यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. पैरवी अधिकारी उकर्डा जाधव व किरसन डाबेराव यांनी सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com