esakal | अकोला जिल्ह्यात १.३४ टक्केच झाली पेरणी
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला जिल्ह्यात १.३४ टक्केच झाली पेरणी

अकोला जिल्ह्यात १.३४ टक्केच झाली पेरणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झाला नसला तरी ६ हजार ६४७ हेक्टरवर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली आहे. त्यामध्ये कपाशी व सोयाबीन पिकांचा समावेश आहे. पेरणी करण्यात आलेले क्षेत्र एकूण प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत १.३४ टक्के आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे. (In Akola district, only 1.34 per cent sowing was done)

हेही वाचा: Corona Cases in Akola; आणखी दोघांचा बळी; ६३ नवे पॉझिटिव्ह

यावर्षी राज्यात वेळीपूर्वीच मॉन्सूनचे आगमन झाले. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या भागात मॉन्सूनने प्रगती केली. त्यानंतर मात्र मॉन्सूनची आगेकूच थांबली. परिणामी जून महिना अर्ध संपल्यानंतर सुद्धा अद्याप जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे खरीप पेरण्यासुद्धा खोळंबल्या आहेत. असे असले तरी काही शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था असल्याने त्यांनी पेरणीचा मुहूर्त साधला आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांची फसवणूक करून होतेय बी-बियाणे व खतांची विक्री

त्यामध्ये अकोट, पातूर व तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. या तालुक्यांसह काही क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने आतापर्यंत जिल्ह्यात ६ हजार ६४७ हेक्टरवर पेरणी आटोपली आहे. असे असले तरी अद्याप कोरडवाहू क्षेत्रात खरीप पेरणी करण्यासाठी दमदार पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

हेही वाचा: महानगरपालिकेत घडला ‘इतिहास’; स्वच्छतेसाठी सर्वपक्षीय ‘एकजुट’

जिल्ह्यातील बहुतांश महसूल मंडळांमध्ये अद्याप १०० मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी चांगला पाऊस झाल्यानंतरच खरीप पिकांची पेरणी करावी. पेरणीसाठी घरचे बियाणे वापरायचे असल्यास बीज प्रक्रिया करुन घ्यावी.
- कांतप्पा खोत
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला

संपादन - विवेक मेतकर
In Akola district, only 1.34 per cent sowing was done

loading image