Akola : केंद्राला जागे करण्यासाठी जनतेच्या दरबारात ; एच. के. पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

h.k. patil

केंद्राला जागे करण्यासाठी जनतेच्या दरबारात ; एच. के. पाटील

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वर्धा : केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाई गगनाला भिडली. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच देश २५ वर्षे मागे गेला असताना जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जात नाही. याविरुद्ध जनतेमध्ये जाऊन जगजागृती करण्यासाठी काँग्रेसने ‘जगजागरण अभियान’ हाती घेतले. आठवडाभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सरकारला जागे करण्यासाठी काँग्रेस जनतेच्या दरबारात जात आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी दिली.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या राज्यव्यापी जनजागरण अभियानाला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सुरुवात करण्यात आली. वर्धा येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून सेवाग्राम आश्रममार्गे करंजी (भोगे) गावापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. या अभियानात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सहभाग घेतला. त्यांच्यासोबत वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार, माजी मंत्री रणजित कांबळे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांनीही सहभाग घेतला.

आश्वासनाचा विसर : पटोले

अच्छे दिन, १०० दिवसात महागाई कमी करू, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू अशी भरमसाठ आश्वासने देऊन २०१४ साली मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार केंद्रात आले. सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे स्वप्न दाखवलेल्या शेतकऱ्यालाच उद्धवस्त करण्याचे काम मोदी सरकार नवीन कृषी कायद्याच्या माध्यमातून करीत आहे. सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी जनजागरण अभियान हाती घेतल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

loading image
go to top