नोंदणी, मुद्रांक विभागातील कर्मचाऱ्यांचे उद्यापासून बेमुदत आंदोलन

आंदोलनामुळे जिल्ह्यातील मालमत्ता-खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णतः ठप्प पडणार
नोंदणी, मुद्रांक विभागातील कर्मचाऱ्यांचे उद्यापासून बेमुदत आंदोलन

अकोला : नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व संवर्गातील पदोन्नत्या गत पाच ते सहा वर्षांपासून रखडलेल्या आहेत त्या मार्गी लावण्याच्या मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचाऱ्यांनी मंगळवार (ता. २१) पासून बेमुदत आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मालमत्ता-खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णतः ठप्प पडतील.

नोंदणी व मुद्रांक विभागातील सर्व संवर्गातील पदोन्नत्या गत पाच ते सहा वर्षांपासून रखडलेल्या आहेत. सदर विषय त्वरीत मार्गी लावावा, पदोन्नतीची कार्यवाही पूर्ण झाल्याशिवाय नवीन सेवा प्रवेश नियम लागू न करणे, विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरणे, कोविड १९ मुळे मृत झालेले विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचे कुटुंबीयांना तात्काळ ५० लाख रुपयांची मदत देणे व कुटुंबातील एका व्यक्तीस अनुकंपा तत्वावर विभागातील नोकरीत सामावून घेणे.

स्वीय प्रपंची लेख्यातील रक्कम विभागातील कार्यालयांच्या व जनतेच्या सुविधेकरीता वापरणे, तुकडेबंदी तसेच रेरा कायद्यान्वये नोंदणी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचेवर करण्यात आलेल्या कार्यवाह्या मागे घेणे, हार्डवेअर साहित्य उच्च दर्जाचे पुरविणे, सर्व्हरच्या अडचणी तात्काळ दूर करणे, आयकर विभागातील विवरण पत्र पोलिस विभाग व इतर विभागाकडून मागणी करण्यात आलेल्या माहिती केंद्रीय सर्व्हरवरुन पुरविणे, पदनाम बदल करणे यासह इतर २१ प्रकराच्या मागण्यांसाठी नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवार (ता. २१) पासून आंदोलन करण्यात येणार आहे. सदर आंदोलनात जिल्हाध्यक्ष अनिल काळे, नितीन चव्हाण, केशव सावरकर, प्रदीप जुनगरे, मीरा पानसे, पी.एस. डोके, जी.एम. लाहोडे व इतर सहभागी होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com