सिंचन तलावाची दुरुस्ती कागदावरच

जामदऱ्याचा तलाव आटल्याने पिके सुकली
Irrigation pond news repair paper only
Irrigation pond news repair paper only

इंझोरी : गेल्या पाच वर्षापासून जामदऱ्याचा तलाव आटत असल्याने गहू, हरभरा ही पिके परिपक्व होण्यापूर्वीच सुकून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे या तलावाची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकरी वारंवार करीत आहेत. अद्यापही या मागणीची दखल न घेतल्याने तलावावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांत रोषाचे वातावरण निर्माण झाले असून, ते तलावाच्या दुरुस्तीसाठी आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

इंझोरी येथून जवळच असलेल्या जामदरा घोटी येथील सिंचन तलावाला गेल्या पाच वर्षांपूर्वी तडा गेल्याने हा तलाव उन्हाळ्यापूर्वीच कोरडा पडत आहे. या तलावाच्या दुरुस्तीसाठी गतवर्षी जि.प. सदस्य विनादेवी जयस्वाल यांनी जल नियोजन समितीकडून ५० लाखांचा निधी मिळण्याचा प्रस्ताव सादर केला होता, हा प्रस्ताव आणि तलावाची दुरुस्ती कागदावरच राहिली. परिणामी, यंदाही हा तलाव कोरडा पडल्याने ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या शेतामधील गहू व इतर रबी पिके सुकत आहेत.

मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी आहे येथे जवळपास २५ ते ३० वर्षांपूर्वी जि. प. जलसंधारण विभागाकडून सिंचन तलावाची निर्मिती करण्यात आली, तलावामुळे शेकडो एकर शेती सिंचनाखाली आली आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. गत पाच वर्षांपूर्वी मात्र या तलावाच्या भिंतीला तडा गेल्याने हा तलाव उन्हाळ्यापूर्वीच कोरडा पडू लागला आहे. त्यामुळे या तलावाच्या आधारे सिंचन करून रबी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची पिके सुकून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

जिल्हा नियोजन समितीकडून ५० लाख रुपयांचा निधी मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची तयारी दर्शविली, तर जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनीही या प्रस्तावाला रेटा लावून तलावाच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात वर्ष उलटले तरी या प्रस्तावाचे आणि तलावाच्या दुरुस्तीचे काय झाले, तेच कळायला मार्ग नाही. अद्यापही तलावाची दुरुस्ती झाली नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com