खामगाव शहरात वाघाचा संचार; रेस्क्यु ऑपरेशन सुरू

खामगाव शहरातील सुटाळपुरा भागातील गजबजलेल्या वस्ती असलेल्या गाडगे बाबा मंदिराजवळील केशव नगरातील गल्लीतील आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास एका वृध्द महिलेला वाघ सदृष्य प्राणी दिसला.
Police Bandobast
Police BandobastSakal

खामगाव (जि बुलडाणा) - शहरात वाघाचे दर्शन झाल्‍याच्‍या चर्चांवर आता शिक्‍का मोर्तब झाला असून, सायंकाळच्‍या सुमारास शहरातील बुंदेल्‍या यांच्‍या शेतात या वाघाचे दर्शन झाल्‍याने शहरात दशहशतीचे वातावरण असून, वनविभागासह, पोलीस प्रशासन रेक्‍स्‍यु ऑपरेशन राबवत आहे.

शहरातील सुटाळपुरा भागातील गजबजलेल्या वस्ती असलेल्या गाडगे बाबा मंदिराजवळील केशव नगरातील गल्लीतील आज पहाटे ४ वाजताच्या सुमारास एका वृध्द महिलेला वाघ सदृष्य प्राणी दिसला. पहाट होताच याची चर्चा सुरू झाल्याने केशव नगरातील राजपूत यांच्या निवासस्थानी लावलेल्या सिसिटिव्ही कॅमेऱ्यात सदर प्राणी कैद झाला. याचे व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होताच विविध चर्चांना उत आला होता. पण स्थानिक नागरीकाच्या सिसिटीव्ही कॅमेऱ्यात सदर वाघ कैद झाल्याने वन विभागाने याची दखल घेवून पडताळणी करण्याचा प्रयत्न केला.

Police Bandobast
कापसाच्या भावात सतत घसरण; शेतकऱ्यांच्‍या चिंतेत वाढ

दरम्यान त्यांना त्यांच्या शोधमोहीमेनुसार आकलन झाले नाही. मात्र सायंकाळी ४ वाजता च्या सुमारास महाकाल चौकातील नाल्याच्या बाजूला असलेल्याच बुंदेले यांच्या शेतात वाघ दडून बसलेला काही नागरीकांना दिसून आला. याची माहिती पोलिस प्रशासनाला देताच वन विभाग खडबडून जागे झाले व त्यांनी वाघाला पकडण्यासाठी परिसरात पिंजरे लावले. दरम्यान सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वाघाला पाहण्यासाठी हजारो नागरीकांनी गर्दी केली होती. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी वाघाला पकडण्यासाठी गण घेवून बुंदेले यांच्या शेतात गेले असता वाघाने डरकाळी फोडताच सर्वांची पाचावर धारण बसली आणि सर्वांनीच पळ काढला. यावेळी नागरीकांना हटविण्यासाठी पोलिसांनी तगडा पोलिस बंदोबस्त लावला तर परिसरातील रस्त्यावरील वाहतुक सुध्दा बंद करण्यात आली आहे.

ज्या शेतात वाघ आहे त्या ठिकाणी अत्यंत घनदाट झाडे झुडपे असून शेताच्या बाजूला नाला आहे. तर शेताच्या चारही बाजून लोकवस्ती आहे. रात्री अंधार असल्यामुळे वाघाला पकडणे अत्यंत कठीण झाले असून गांभीर्य लक्षात घेता अमरावती, बुलडाणा येथील रेस्क्यु टिम खामगावात बोलविण्यात आल्या आहेत. वन्यजीव विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि पोलिस वाघाचा शोध घेत असून त्यांना अनेक अडचणी येत आहेत. दरम्यान राडगड कॉलनी, सिंधी लाईन, सुटाळपुरा, महाकाल चौक यासह शहरातील नागरीकांनी घरातच राहुन सुरक्षा बाळगावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यावेळी घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी, उपविभागीय अधिकारी महसूल राजेंद्र जाधव, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी हे हजर असून तगडा पोलिस बंदोबस्त लावून वाघाचा शोध सुरू आहे. वृत्त लिहेपर्यंत वाघाचा शोध सुरू होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com