Gram Panchayat : तीन महिन्यात तीन वेळाच उघडले कार्यालय!

खेट्री येथील प्रकार; गावाचा विकास खुंटला, संबंधितांचे दुर्लक्ष
khetri gram panchayat office opened only three times in three months rural development patur akola
khetri gram panchayat office opened only three times in three months rural development patur akolasakal

पातूर : गावपतळीवर गावविकासाच्या दृष्टीने ग्रामपंचायतकडून विविध योजना राबविल्या जातात. शासनाकडून मिळालेल्या निधीचा योग्य वापर करून ग्रामस्थांना सुविधा दिल्या जातात. परंतु, ग्रामपंचायतमध्ये कायमस्वरुपी सचिव मिळत नसल्याने गत तीन महिन्यात फक्त तीन वेळा ग्रामपंचायतचे कार्यालय उघडल्याचे धक्कादायक प्रकार तालुक्यातील खेट्री येथे पाहवयास मिळाला.

तीन महिन्यात मासिक सभेसाठीच ग्रामपंचायतचे कुलुप उघडले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. तालुक्यातील खेट्री ग्रामपंचायत कार्यालय तीन महिन्यात तीन वेळा उघडली असून, उर्वरित दिवशी ग्रामपंचायत कार्यालयाला नेहमी कुलूप असते. त्यामुळे गावाचा विकास खुंटला असून, ग्रामस्थांचे विविध कामे प्रलंबित आहेत.

याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामस्थमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तात्पुरता सचिवाची नियुक्ती केली जात असल्याने गावात विकास कामे अद्यापही करण्यास सुरुवात झाली नाही. नवनिर्वाचित सरपंचाने पदभार स्वीकारल्यापासून दोन सचिवांची बदली झाली असून, कार्यरत असलेले सचिव रजेवर गेल्याने गाव वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.

khetri gram panchayat office opened only three times in three months rural development patur akola
Akola Riots : अकोला दंगलीतील मयत तरुणाच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी ठाकरे गटाने स्वीकारली तर भाजपने...

सचिवांची रजा मंजूर करण्याआधी इतर सचिवांकडे पदभार सोपविण्याची गरज असताना कोणत्याही सचिवाकडे पदभार न देता सचिव रजेवर गेल्याने गावाचा विकास खुंटला आहे. याकडे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दखल घेणे गरजेचे आहे. याबाबत सचिवांशी वारंवार संपर्क केला असता, मोबाईल बंद असल्याने त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.

मोबाईल बंद, प्रतिसाद मिळेना, ग्रामस्थ वैतागले

सचिवांचा मोबाईल नेहमीप्रमाणे बंद असल्याने ग्रामस्थ वैतागले असून, गावाचा विकास खुंटला असून, ग्रामस्थांचे विविध कामे प्रलंबित आहे. याकडे संबंधित वरिष्ठांनी दखल घेणे गरजेचे आहे.

तीन महिन्यांपासून ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप

मासिक सभेऐवजी ग्रामपंचायत कार्यालयाला गेल्या तीन ते साडेतीन महिन्यापासून कुलूप असल्याने ग्राममस्थ त्रस्त असून, कायमस्वरूपी सचिवाची मागणी होत आहे.

khetri gram panchayat office opened only three times in three months rural development patur akola
Akola News : जि.प.च्या २० टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या

सचिव आर.एन. पाटेखेडे रुजू झाल्यापासून फक्त मासिक सभेलाच हजर राहतात, उर्वरित दिवसात ते येत नाहीत. तीन महिन्यात तीन वेळा मासिक सभा घेण्यात आली. त्यावेळेस ते हजर झाल्यामुळे तीन वेळाच ग्रामपंचायत कार्यालय उघडली आहे. कायमस्वरूपी सचिव नसल्याने गावाचा विकास खुंटला आहे.

- जहूर खान, सरपंच, खेट्री.

सध्या उन्हाळ्याचे दोन आठवडे उरले असून, दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोल गेल्याने विहिरीचे पाणी दुषित येत असल्याने ब्लॅचिंग पॉडरची आवश्यकता आहे. परंतु, सचिव अभावी ग्रामपंचायत कार्यालयाला नेहमी कुलूप असते, सचिवांचा फोन सुद्धा नेहमी बंद असते, वरिष्ठांनी दखल घेण्याची गरज आहे.

- शेख साजिद, ग्रामपंचायत सदस्य, खेट्री.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com