Akola Crime : किसनराव हुंडीवाले हत्याकांड प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार वकीलच फुटला!

महाराष्ट्र गवळी समाजाचे नेते स्व. किसनराव हुंडीवाले यांच्या खून प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
Kisanrao hundiwale
Kisanrao hundiwalesakal

अकोला - महाराष्ट्र गवळी समाजाचे नेते स्व. किसनराव हुंडीवाले यांच्या खून प्रकरणात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. गुरुवारी (ता. ८ जून ) याच प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेले वकील ॲड. तुळशीदास उर्फ संतोष भोरे फितूर झाल्याचे विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी घोषित करत त्यांच्या उलटतपासणीला सुरुवात केली.

धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये ता. ६ मे २०१९ रोजी सकाळी ११.४५ वाजताच्या सुमारास महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष, समाजसेवक किसनराव हुंडीवाले यांची विक्रम ऊर्फ छोटू श्रीराम गावंडे, श्रीराम कसदन गावंडे, रणजित श्रीराम गावंडे, प्रवीण श्रीराम गावंडे, धीरज प्रल्हाद गावंडे, सूरज प्रल्हाद गावंडे, श्रीराम कसदन गावंडे, मंगेश श्रीकृष्ण गावंडे, सतीश सुखदेव तायडे, विशाल शंकर तायडे, मयूर गणेशलाल अहिर, दिनेश राजपूत (ठाकूर), प्रतीक दत्तात्रय तोंडे व मो.साबीर यांनी निर्घृण हत्या केली होती.

या प्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या न्यायालयात खटला सुरू आहे. गुरुवारी याच प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेले आरोपी श्रीराम गावंडे यांचे वकील ॲड. तुळशीदास उर्फ संतोष सारंगधर भोरे यांची साक्ष नोंदविण्यास सुरुवात झाली. परंतु त्यांचे पोलिसांनी नोंदविलेले बयाण आणि न्यायालयात सुरू असलेली साक्ष यामध्ये प्रचंड तफावत आढळून आली.

Kisanrao hundiwale
Gathering of Alcoholics : चक्क ‘मद्यपीं’चे संमेलन होणार अमरावतीला; आजी-माजी मद्यपींचा राहणार सहभाग

परिणामी विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेले ॲड. भोरे यांना फितूर घोषित करीत त्यांची उलटतपासणी घेण्यास सुरुवात केली. गुरुवारी दुपारपर्यंत सदर उलटतपासणी झाली. उर्वरित उलटतपासणी ही शुक्रवारी पुन्हा घेण्यात येणार आहे. या प्रकरणात विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांच्यासोबत सरकारी वकील आर.आर. देशपांडे हे काम बघत आहेत.

उलट तपासणी दरम्यान बचाव पक्षाच्या वकिलांचा आक्षेप

न्यायालयात गुरुवारी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ॲड. संतोष भोरे यांना फितूर घोषित करताच विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्ज्वल निकम यांनी त्यांची उलटतपासणी करण्यास सुरुवात केली. यावेळी सहकारी म्हणून ॲड. नरेंद्र धुत यांची मदत घेतली.

Kisanrao hundiwale
Amravati Crime : कपडे बदलविताना मोबाईलने चित्रीकरण करणाऱ्यास चोपले

ते धर्मदाय आयुक्त कार्यालयात झालेल्या घटनाक्रमाबाबत माहिती देत असता बचावपक्षाचे वकील ॲड. सोमनाथ लढ्ढा यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे दोन्ही पक्षातील वकिलांमध्ये न्यायालयात चांगलीच खडाजंगी झाली. त्यामुळे उलटतपासणी अर्धवट राहली. आता शुक्रवारी उर्वरित उलट तपासणी पूर्ण केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com