अकरावी विज्ञान प्रवेशाची यादी आज होणार जाहीर, संकेतस्थळावर सायंकाळी होणार उपलब्ध

सुगत खाडे  
Tuesday, 25 August 2020

महानगरातील विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत सहजरित्या प्रवेश घेता यावा यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने अकरावी विज्ञान शाखेची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

अकोला : महानगरातील विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत सहजरित्या प्रवेश घेता यावा यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने अकरावी विज्ञान शाखेची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

त्याअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ३ हजार ७२५ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली. दरम्यान मंगळवारी (ता. २५) प्रवेश प्रक्रियेतील नियमित पहिल्या फेरीसाठीची विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थी ३१ ऑगस्टपर्यंत निवड झालेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेवू शकतील.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल २९ जुलै रोजी जाहीर झाला. त्यानंतर अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेस वेग आला. त्याअंतर्गत विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळावा यासाठी ११ ऑगस्टपपासून शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे.

प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी २० ऑगस्टपर्यंत ३ हजार ७२५ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले. सदर अर्जांतील त्रृतींची पूर्तता केल्यानंतर मंगळवारी (ता. २५) केंद्रीय प्रवेश समिती विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर करेल. केंद्रीय प्रवेश समिती सकाळी १० वाजता विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी कॉजेलला देईल, त्यानंतर सायंकाळी यादी ‘सीएओअकोला.इन’ संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

गुणवत्ता यादीत नाव असलेले विद्यार्थी ३१ ऑगस्टपर्यंत संबंधित कॉलेजमध्ये प्रवेश घेवू शकतील. त्यानंतर विद्यार्थ्यांची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय प्रवेश समितीच्या वतीने शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद व सचिव गजानन चौधरी यांनी दिली आहे.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The list of Akola Eleventh Science Admissions will be announced today