अकोला : २९४ शेतकऱ्यांना ४.६१ कोटीचे तारणकर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अकोला : २९४ शेतकऱ्यांना ४.६१ कोटीचे तारणकर्ज

अकोला : २९४ शेतकऱ्यांना ४.६१ कोटीचे तारणकर्ज

अकोला : विविध योजना व सुविधांचा लाभ देऊन शेतकऱ्यांचे सर्वार्थाने हीत जोपासण्याचे काम अकोला(akola) कृषी उत्पन्न बाजार समिती वर्षोगणती करीत आहे. सन २०२१-२०२२ मध्ये देखील तालुक्यातील २९४ शेतकऱ्यांना चार कोटी ६१ लाख रुपयांचे शेतमाल तारणकर्ज स्वनिधीतून उपलब्ध करून देऊन आर्थिक पाठबळ देण्याचे कार्य अकोला बाजार समितीने केले आहे.(loan of Rs 4.61 crore to 294 farmers)

हेही वाचा: इस्लामपूर नगरपालिकेची ३ जानेवारीची सभा रद्दचे निर्देश!

बाजारामध्ये शेतमालाची आवक वाढल्यास बाजारभाव कमी होऊन त्याचा फटका शेतकऱ्यांना बसू नये याकरिता महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने शेतमाल तारण कर्ज योजना राज्यभर राबवित आहे. शेतकऱ्यांनी शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, अमरावतीचे विभागीय उपसरव्यवस्थापक मच्छिंद्र गवळे यांनी केले आहे. शेतकऱ्यांचे हीत जोपासत अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांना शेतमाल तारणकर्ज वितरणात नेहमीच अग्रेसर राहाली आहे.(akola news)

हेही वाचा: पुणे : मुलांच्या लसीकरणासाठी आता ४० केंद्र

सन २०२१-२०२२ या वर्षामध्ये सुद्धा अकोला बाजार समितीने २९४ शेतकऱ्यांना चार कोटी ६१ लाखाचे शेतमाल तारणकर्ज स्वनिधीतून सोयाबीन, तूर या शेतमालावर वाटप केले आहे. शेतमाल तारण योजनेमध्ये ठेवताना स्वच्छ काडी कचरा नसलेला व १२ टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा नसलेला शेतमाल स्वीकारण्यात येत असल्याने व सदर योजना सहा महिने कालावधीकरिता असल्याने या मुदतीमध्ये शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री करणे आवश्‍यक आहे. त्यानुसार बाजार भावाचा अंदाज घेऊन शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन बाजार समितीद्वारे करण्यात आले आहे.

बाजारभावाचा नियमित आढावा घ्यावा : धोत्रे

शेतकऱ्यांनी शेतमाल, तारण योजनेमध्ये ठेवताना भविष्यकालीन बाजारभाव व झालेले उत्पादन यांचा अंदाज घेऊन शेतमाल तारणामध्ये ठेवावा तसेच चढत्या भावाचा फायदा घेण्याकरिता बाजार भावाचा नियमित आढावा शेतकरी बंधुंनी घ्यावा व त्यानुसार विक्री करण्याचे आवाहन अकोला बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :AkolaFarmerloans
loading image
go to top