शिष्यवृत्तीचे अर्ज‎ भरण्यास अडचणी

महाडीबीटीचे सर्व्हर डाऊन, बँक खाते आधार‎ लिंक नसल्याने विद्यार्थ्यांना त्रास
 MAHADBT server down Difficulties filling scholarship applications Khamgaon
MAHADBT server down Difficulties filling scholarship applications Khamgaonsakal

खामगाव : वर्ष २०२१-२२ या वर्षातील सर्व‎ प्रवेशित व शिष्यवृत्तीस पात्र‎ अनुसूचित जाती, विजाभज, इमाव‎ तसेच विमाप्र प्रवर्गातील‎ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन महाडीबीटी‎ प्रणालीवर अर्ज नोंदवण्यासाठी‎ २८ फेब्रुवारी ही अंतिम‎ मुदत दिली होती. मात्र, सर्व्हर‎ डाऊन, जात-उत्पन्न प्रमाणपत्र‎ मिळण्यास विलंब, तर काहींचे बँक‎ खाते आधार कार्ड क्रमांकाशी‎ लिंक नसल्याने शिष्यवृत्तीचे अर्ज‎ भरण्यास अडचणी येत आहेत.‎ यामुळे एससीला ७ मार्च, तर‎ व्हीजेएनटी, ओबीसी, एसबीसीला‎ अर्ज भरण्यासाठी ३१ मार्चची मुदत‎ दिली आहे.‎

बुलडाणा जिल्ह्यातील‎ महाविद्यालयात प्रवेशित अनुसूचित‎ जाती, इमाव, विजाभज तसेच‎ विमाप्र प्रवर्गातील व भारत सरकार‎ मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी‎ पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे‎ महाडीबीटी प्रणालीवर ऑनलाइन‎ अर्ज नोंदणी करण्यासाठी १४‎ डिसेंबर २०२१ पासून सुरुवात झाली‎ आहे. मागील शैक्षणिक वर्षात उशिराने‎ प्रवेश झाले, तर शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाइन‎ भरण्यासाठी १४ डिसेंबर २०२१ पासून सुरुवात‎ झाली. संपूर्ण महाराष्ट्रासाठी महाडीबीटी हे‎ एकमेव पोर्टल अाहे. यावर अर्ज भरण्यासाठी‎ पहिल्या टप्प्यात फक्त महिनाभराचा कालावधी‎ दिल्यामुळे राज्यभरातील विद्यार्थी एकाच वेळेत‎ अर्ज भरत असल्यामुळे सर्व्हर डाऊन होऊ‎ लागले. यावर कागदपत्रे अपलोड होईना.‎ अजूनही ग्रामीण भागात काही ठिकाणी‎ इंटरनेटची स्पीड मिळत नसल्यामुळे अर्ज‎ भरता येत नाही. तसेच अर्ज भरण्यासाठी‎ लागणारे जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र‎ वेळेत मिळत नाही.‎

तर शासनाकडून एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे‎ ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ७ मार्च, तर व्हीजेएनटी,‎ ओबीसी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ३१ मार्च २०२२‎ अशी मुदत देण्यात आली आहे.

मुदतवाढीच्या दोन तारखांमुळे संभ्रम‎

एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे ऑनलाइन अर्ज‎ भरण्यासाठी ७ मार्च, तर व्हीजेएनटी, ओबीसी, एसबीसी‎ प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ३१ मार्च २०२२ अशी मुदत देण्यात‎ आली आहे. दोन वेगवेगळ्या तारखा कशा? याबाबत‎ विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे.‎

विद्यार्थ्यांना सक्‍त सुचना

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना बॅँक खात्याशी आधार लिंक केले होते. परंतु, कॉलेजने आता पुन्हा एकदा बँक खात्याला आधार लिंक करून बँकेकडून आधार लिंक करण्यात आल्याबाबताचे ऑफिशियल स्टेटमेंट आणण्यास सांगितले आहे. स्टेटमेंट नसल्यास फॉर्म जमा करून घेतला जाणार नाही, अशी सक्त सूचना विद्यार्थ्यांना दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com