अकोला : रेशन कार्ड दुरूस्तीचे काम ठप्प!

तांत्रिक अडचणीमुळे नागरिकांना हेलपाटे; नवीन कार्ड बनवणाऱ्यांनाही अडचण
MahaPDS website technical problem Ration card repairs
MahaPDS website technical problem Ration card repairssakal

अकोला : शासनाच्या महापीडीएस संकेतस्थळावर तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने गत काही दिवसांपासून रेशन कार्ड दुरूस्ती, नाव जोडणी, नाव कमी करणे व नवीन शिधापत्रिका बनवण्याचे काम ठप्प पडले आहे. जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात सदर तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने शिधापत्रिकाधारकांसह सर्वसामान्य नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. या तांत्रिक खोड्यामुळे धान्य वाटपावर सुद्धा परिणाम होत असल्याची माहिती आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमाअंतर्गत जिल्ह्यातील हजाराे गाेरगरिबांना अनुदानित दराने धान्याचे वाटप करण्यात येते. त्यामध्ये शहरी व ग्रामीण क्षेत्रात राहणाऱ्या लाेकांचा समावेश आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याचे अधिकार हे जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचे आहेत. परिणामी जिल्हा पुरवठा विभागामार्फत स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून जिल्ह्यातील अंत्योदय, प्राधान्य गटांसह शेतकरी कुटुंबातील हजारो पात्र रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्याचे वाटप करण्यात येते.

सदर धान्य हे लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात मिळत असल्याने त्याचा लाभ लाखो लाभार्थ्यांना होतो. अनेक लाभार्थी कुटुंबांचा संपूर्ण उदरनिर्वाह याच धान्यातून होतो. त्यामुळे लाभार्थ्यांच्या जीवनात सवलतीच्या दरातील धान्य वाटपाला अतिशय महत्व आहे. सदर धान्याचे वाटप करताना रेशन कार्ड मोलाची भूमिका बजावते.

रेशन कार्ड असलेल्या पात्र लाभार्थ्यांनाच रेशनचे धान्य देण्यात येतो. सदर रेशन कार्डमध्ये धान्य लाभार्थ्याचे नाव कमी करणे किंवा एखाद्या लाभार्थ्याचे नाव जोडणे किंवा त्यात किरकोळ दुरूस्ती करण्याचे काम गत काही दिवसांपासून शासनाच्या संकेतस्थळावर तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने ठप्प पडले आहे. याव्यतिरिक्त नवीन आरसी म्हणजेच नवीन रेशन कार्ड बनवण्याचे काम सुद्धा बंद आहे. त्यामुळे गरिब नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

धान्य वाटपावरही परिणाम

राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागासाठी विकसित करण्यात आलेल्या महापीडीएस संकेतस्थळावरील कार्यालयीन काम गत काही दिवसांपासून तांत्रित अडचणीमुळे बंद आहे. त्यामुळे रेशन कार्डसोबतच धान्य वाटपावरही त्याचा प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे. ही अडचण संपूर्ण राज्यस्तरावर असल्याने इतर जिल्ह्यातील नागरिकांना सुद्धा त्याचा फटका बसत आहे.

अशी आहे जिल्ह्याची स्थिती

  • जिल्ह्यात ४४ हजार ७५३ अंत्योदय गटातील कार्डधारकांना सवलतीच्या दरात धान्याचे वाटप करण्यात येते.

  • जिल्ह्यात प्राधान्य गटात ११ हजार ४ हजार ७८७ लाभार्थी आहेत.

  • एक लाख ९४ हजार एपीएल केशरी कार्डधारक शेतकरी कार्डधारक आहेत.

शासनाच्या महापीडीएस प्रणालीवर काही दिवसांपासून तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे रेशन कार्डात नाव समाविष्ट करणे, कमी करणे, इतर दुरूस्ती करणे व नवीन रेशन कार्ड बनवण्याचे काम बंद आहे. तांत्रिक अडचण दूर होताच रखडलेली कामे सुरू होतील.

- बी. यू. काळे जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com