सिंदखेड राजा बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा

ncp
ncpe sakal

बुलडाणा : सिंदखेड राजा कृषी उत्पन्न बाजार समितीवर (sindkhedraja apmc) हा विकास आघाडीचा झेंडा रोवला गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) प्रा. मधुकर गावडे यांची मुख्य प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सिंदखेड राजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती.

ncp
'कामात अडथळा', नितीन गडकरींचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

राज्यांमध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाविकास आघाडीचे सत्ता पाहायला मिळत होती. त्यामुळे मातृतिर्थ कृषी उत्पन्न बाजार समितीवर १७ सदस्यीय अशासकीय प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामध्ये मुख्य प्रशासक म्हणून प्रा. मधुकर सुखदेव गव्हाड तर सुरेश माधवराव तुपकर , राजेंद्र शामराव शेळके , प्रकाश एकनाथ चौधरी ,प्रकाश अंबु राठोड ,विजयसिंह वसंतराव जाधव, अमोल शंकर गवळी ,कडुबा बारकुजी मुंडे, पांडुरंग रावसाहेब सोळंके, मंगेश विश्वंभर आप्पा खुरपे ,नीळकंठ सोपानराव जाधव, शिवदास रामचंद्र रिंढे, सुधीर श्रीराम आप्पा बेदाडे, सिद्धार्थ महेश जाधव, गंभीरराव लक्ष्मण खरात, दिलीप नारायण आढाव यांची प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था एम.ए. कृपलानी यांनी एका पत्राद्वारे नियुक्ती केलेली आहे.

सिंदखेड राजा तालुक्यातील पंचायत समिती, नगर परिषद व कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीच्या ताब्यामध्ये आहे. यावेळी मुख्य प्रशासक प्रा.मधुकर गव्हाड यांनी सकाळ सोबत बोलतांना सांगितले की, भविष्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा व शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा यासाठी महाविकास आघाडी व पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी शेतकऱ्यांच्या फायद्याचे निर्णय घेण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करणार आहे. बाजार समिती स्थापनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकरी बांधवांच्या मालास योग्य बाजारभाव मिळावे, उत्पादक शेकऱ्यांचा माल विकण्याची व्यवस्था उत्तम व चोख व्हावी हा आहे. याच उद्देशांसाठी बाजार समितीची स्थापना करण्यात आली. त्याच पद्धतीने भविष्यामध्ये काम सुरू राहणार आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले. महाविकास आघाडीकडून मुख्य प्रशासक व इतर संचालकाचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com