रुग्णांच्या नातलगांसाठी ‘मेडिकल बुलेटिन’

श्रीमती शोभादेवी गोयनका कोविड केअरचे लोकार्पण संपन्न
रुग्णांच्या नातलगांसाठी ‘मेडिकल बुलेटिन’

अकोला ः : 'जनसेवा ही ईश्वर भक्ती' या उक्तीप्रमाणे काम करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अकोला येथे कोरोना बधितांच्या अलगिकरणासाठी आदर्श संस्कार मंडळाद्वारे संचालित शोभादेवी गोयनका कोविड केअरचे लोकार्पण करण्यात आले. दरम्यान जवाहर नगर, कृषी नगर येथील श्रीमती शोभादेवी गोयनका गर्ल्स होस्टेल येथे सुरू झालेल्या कोविड केअर सेंटर येथे अत्याधुनिक यंत्र सामुग्रीसह सुसज्ज रुग्णालय उभारले असून, कोविड रुग्णांना लागणाऱ्या सर्व सोयी उपलब्ध आहेत. तज्ज्ञ वैद्यकीय चमूसह सर्व अत्यावश्यक सुविधा उभारल्या आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांविषयीची माहिती दररोज मेडिकल बुलेटीनद्वारे दिली जाणार असून, हा प्रकल्प रुग्णसेवेसाठी ‘ना नफा ना तोटा’ तत्वावर कार्य करणार आहे. Medical bulletin for relatives of patients

बधितांना सहकार्य करा

कोविडच्या प्रादुर्भावात सेवा ह्या एकमेव हेतूने हा प्रकल्प सुरू केला आहे.कोविड केअर सेंटरसाठी गोयनका परिवारासह समाजातील दानशूर मंडळींनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. समाजातील नागरिकांनी शक्य असेल ती मदत कोरोना बधितांना करावी असे आवाहन आदर्श संस्कार मंडळाचे सचिव शशांक जोशी यांनी केले आहे.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com