होय, गाजरगवताची चिंता सोडा, ‘या’ जातीचे भुंगे करतील ते फस्तं!

अनुप ताले
रविवार, 2 ऑगस्ट 2020

अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्यातील दिग्रस बु. या लहानग्या गावात सेंद्रिय शेतीची कास धरत, राज्यशासनाच्या ‘शेतीनिष्ठ शेतकरी’ पुरस्काराचे मानकरी ठरलेले कृषीभूषण राजेंद्र ताले या शेतकऱ्यांनी शेतीतील प्रयोगशिलतेतून हा उपक्रम जिल्ह्यात पहिल्यांदाच राबविला. परिसरातील काही शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी नैसर्गिक पद्धतीने गाजरगवताचे निर्मुलन करण्याचा ध्यास घेतला होता आणि वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येथे त्यांच्या या विचाराला चालना मिळाली. या प्रयोगाबाबत त्यांना विचारना केली असता, ते म्हणाले....

अकोला : आमच्या गावातच नाही तर, अख्ख्या जिल्ह्यात, राज्यात शेतकरी गाजरगवत शेफारल्यानं परेशान आहे. कितीही कापा, कोणतही भारीच औषध फवारा, गाजर गवत काही आजपर्यंत मेल नाही भाऊ. आता मात्र या डोकदुखीपासून पिच्छा सोडवायसाठी निसर्गानच आम्हाले रस्ता दाखवला आहे. संशोधकांच म्हणनं आहे की, मेक्सीकन भुंगे फक्त गाजरगवतच खातात. म्हणून मग पातूर तालुक्यातील आम्ही काही शेतकऱ्यांनी परभणीहून सात हजार भुंगे आणले अन् शुक्रवारी (ता.३१) परिसरातील पाच गावात गाजर गवतावर सोडले. आता हे भुंगे नक्कीच ते फस्त करून नैसर्गिक पद्धतीने गाजर गवताचे निर्मुलन करतील, असा विश्‍वास शेतकऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

 

अकोला जिल्ह्यात पातूर तालुक्यातील दिग्रस बु. या लहानग्या गावात सेंद्रिय शेतीची कास धरत, राज्यशासनाच्या ‘शेतीनिष्ठ शेतकरी’ पुरस्काराचे मानकरी ठरलेले कृषीभूषण राजेंद्र ताले या शेतकऱ्यांनी शेतीतील प्रयोगशिलतेतून हा उपक्रम जिल्ह्यात पहिल्यांदाच राबविला. परिसरातील काही शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांनी नैसर्गिक पद्धतीने गाजरगवताचे निर्मुलन करण्याचा ध्यास घेतला होता आणि वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येथे त्यांच्या या विचाराला चालना मिळाली. या प्रयोगाबाबत त्यांना विचारना केली असता, ते म्हणाले, ‘भाऊ, शेतात तसेच गावातही वर्षोगणती गाजरगवताचा वाढता प्रादुर्भाव सर्वांसाठीच डोकेदुखी ठरत आहे. त्यावर काहीतरी शाश्‍वत उपाय सापडेलच असा विश्‍वास होता अन् तो सापडला! ‘झायगोग्रामा (मेक्सिकन)’ नावाचा भुंगा केवळ गाजरगवतावर उपजीविका करतो आणि हे भुंगे वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येथे उपलब्ध असल्याची माहिती, तेथील एका शास्त्रज्ञांकडून मिळाली. ही माहिती मी गावातील काही शेतकऱ्यांना दिली अन् ते भुंगे आणण्याचा आम्ही निश्‍चय केल्याचे सांगितले.

 

सात हजार भुंग्यांची फौज!
या प्रयोगांतर्गत राजेंद्र ताले व गावातील नंदराज ताले, समाधान भालतिडक, हिंगणा येथील नितीन उजाडेल, राहेर येथील आकर्षण काळे, शिर्ला येथील सचिन कोकाटे, मोरखडे व आलेगाव येथील अक्षय जैन यांनी ३० जुलै रोजी परभणीवरून सात हजार मेक्सिकन भुंगे आणले व ही भुंग्याची फौज ३१ जुलै रोजी आपापल्या परिसरात गाजरगवतावर सोडली.

स्मशानभूमी परिसरात सोडले भुंगे
या पहिल्या प्रयोगात, राजेंद्र ताले यांनी स्व खर्चातून आणलेले मेक्सिकन भुंगे गावातील स्मशानभूमी परिसरात सोडून सर्वप्रथम येथील गाजर गवत निर्मुलन करण्याला प्राधान्य दिले आहे. यावेळी त्यांचेसोबत गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच नंदराज ताले, गोपाल ताले, मोरेश्वर ताले, गणेश धोत्रे, अजित ताले, कपिल ताले, अमोल ताले, सावन गवई, श्रीकांत ताले, अनंता ताले, ऋषिकेश ताले, विजय अंभोरे, वैभव ताले, गोविंद गवई आदी गावकरी सुद्धा उपस्थित होते.

 

असे होते गाजर गवताचे निर्मुलन
गाजरगवतावर उपजिविका करणारा हा झायगोग्रामा भुंगा मेक्सिकोतून आयात करण्यात आला आहे. त्यांना त्रिशूल भुंगे असेही म्हणतात. मादी भुंगे साधारणपणे २००० अंडी घालतात. पावसाळ्यात जून ते ऑक्टोबरपर्यंत हे भुंगे गाजर गवत फस्त करतात. हे भुंगे फक्त गाजर गवतावरच जगतात. गाजर गवत उपलब्ध नसल्यास भुंगे जमिनीत सुप्तावस्तेत साते आठ महिने दडून बसतात आणि पावसाळा सुरू होताच बाहेर पडून गाजर गवतावर ताव मारतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mexican beetles will eradicate Gajar grass