esakal | बुलडाणा : ऑनलाइन सेतू अभ्यासक्रमामध्ये चुका
sakal

बोलून बातमी शोधा

setu

बुलडाणा : ऑनलाइन सेतू अभ्यासक्रमामध्ये चुका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर (बुलडाणा) : ऑनलाइन सेतू अभ्यासक्रमामधील चुका पाहण्याची जबाबदारी घेतली जात नसल्याने विद्यार्थ्यांची पंचाईत होत असल्याचा प्रकार १ सप्टेंबर रोजी उघड झाला आहे. सदर अभ्यासक्रम हा पुण्यावरून ऑनलाइन येत असल्याने स्थानिक स्तरावरून कुणीही हस्तक्षेप करत नसल्याचे समजते. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण होत असल्याने शिक्षण विभाग याकडे लक्ष देईल काय असा प्रश्न निर्माण होत आहे.

कोरोना काळात शाळा बंद असल्याने शिक्षण विभाग ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे घरबसल्या देण्याचा प्रयत्न करीत आहे. यामध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य चे वतीने सेतू अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने दररोज पाठविला जातो. यामध्ये १ सप्टेंबर रोजी च्या इयत्ता ९ वीच्या इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमात चारही वेगवेगळ्या प्रश्नाला पर्यायी उत्तर म्हणून एकसारखेच पर्याय देण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता.

वास्तविक पाहता त्यासाठी जो ऑनलाइन व्हिडीओ पाठवण्यात आला होता. त्यामध्ये जे उत्तर सांगण्यात येत होते त्या पर्यायामध्ये चुका असल्याचे दिसून येते. असे असतानाही हा अभ्यासक्रम ज्‍यांनी पाठविला त्यांच्‍या सुध्दा हा विषय कसा लक्षात आला नाही हे कोडे असून, हे समोर आलेले उदाहरण असले तरी या व्यतिरिक्त चुका होत असतील तर त्याचे काय? असा प्रश्न उपस्‍थित होत आहे. त्‍यामुळे अभ्यासक्रम पाठविणाऱ्यांनी लक्ष देऊन विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.

loading image
go to top