esakal | आमदार निलंबनाचे पडसाद जिल्हाभर; भाजपकडून आंदोलन, रास्ता रोको
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार निलंबनाचे पडसाद जिल्हाभर; भाजपकडून आंदोलन, रास्ता रोको

आमदार निलंबनाचे पडसाद जिल्हाभर; भाजपकडून आंदोलन, रास्ता रोको

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः भाजपच्या १२ आमदारांना विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांनी एक वर्षाकरिता निलंबित केले. या घटनेचे पडसाद मंगळवारी अकोला जिल्ह्यातही उमटले. जिल्हाभर भाजपकडून ठिकठिकाणी निषेध नोंदविण्यासाठी निदर्शने व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. (MLA's suspension reverberates across district; Movement from BJP, block the road)

हेही वाचा: जिल्हा परिषदेच्या राजकारणात विधानसभेची मोर्चेबांधणी


.
मूर्तिजापुरात भाजपकडून शासनाचा निषेध
राज्य विधीमंडळाच्या पावसाळी आधिवेशनात ओबीसी व मराठा समाजाच्या प्रश्नांबाबात तालिका अध्यक्षांना जाब विचारणाऱ्या भाजपच्या १२ आमदांरांवरील निलंबनाच्या कारवाईचा आज मूर्तिजापुरात नगराध्यक्षा मोनालीताई कमलाकर गावंडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, भाजपा तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे, शहराध्यक्ष रितेश सबाजकर, विनायक वारे, हर्षल साबळे यांच्या नेतृत्वात असंख्य कार्यकर्त्यांनी निषेध केला व प्रदेश कार्यालयाच्या निर्देशानुसार आंदोलन करण्याचा इशारा दिला.


तेल्हारा तहसीलदार यांना निवेदन
आमदार निलंबनाच्या निषेधार्थ भाजप तालुकाध्यक्ष गजानन उंबरकार यांच्या नेतृत्वात महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष नयनाताई मनतकार,जिल्हा सरचिटणीस केशवराव ताथोड यांच्या प्रमुख उपस्थितीत ता.६ जुलै रोजी तेल्हारा तहसीलदार यांना निवेदन सादर करून महाविकास आघाडी सरकारचा जाहिर निषेध व्यक्त केला.निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणे,न प अध्यक्षा जयश्री पुंडकर,ओबिसी आघाडी जिल्हा सरचिटणीस लखन राजनकर सरचिटणीस सतिष जैस्वाल, रवि गाडोदिया, गजानन गायकवाड, उपाध्यक्ष विजय देशमुख, भाजयुमो शहरध्यक्ष गणेश इंगोले, अविनाश मनतकार, गजानन नळकांडे,राहुल झापर्डे, श्याम वानखडे, रवि शर्मा, अतुल विखे विशाल कोकाटे, दिलिप पवार,सुमित गंभिरे, शुभम पांडे बाळकृष्ण पवार,योगेश भारुका, जुगल वर्मा, श्यामल देशमुख यांच्यासह भाजपा तालुका व शहर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

MLA's suspension reverberates across district; Movement from BJP, block the road

loading image