नागपूर : आययुडीपीवासींचा कोण वाली हो?

तीन वर्षे लोटूनही लीज नूतनीकरणापासून वंचित
आययुडीपी
आययुडीपीsakal

कामठी : आज लीजच्या नूतनीकरण करण्याच्या मागणीसाठी तीन वर्षे लोटले. मात्र लीज नूतनीकरण करण्यात आले नसल्याने आययुडीपी रहिवासी हे खुद्द अतिक्रमित झाल्याचे निदर्शनास येते. ३० वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या जागेवर लिज पद्धतीने भाडेतत्वावर असलेल्या आययुडीपिवासींना अतिक्रमणवासी ठरविण्यात येत आहे. नुतनीकरणासाठी कुठलीही कार्यवाही केली नाही. तेव्हा या आययुडीपीवासींचा कुणीतरी वाली आहे का हो, असा प्रश्न येथील आययुडीपीवासी करीत आहेत.

नगर परिषद प्रशासन हद्दीत येणाऱ्या आनंद नगर परिसरातील झोपडपट्टीवासीयांना १९८२ मध्ये ही जागा नर्सरीसाठी आरक्षित असल्याची बतावणी करून नगर परिषदेच्यावतीने आनंद नगरवासींना घरे खाली करण्याचे ‘फर्मान’ सोडले होते. अशावेळी या नागरिकांनी राहायचे कुठे, असा प्रश्न उभा ठाकल्याने नगर परिषद प्रशासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक शहर विकास योजनेअंतर्गत पर्यायी व्यवस्था म्हणून नवीन कामठी परिसरातील आययुडीपी परिसरात प्रति भूखंड १८०० रुपये प्रति प्रमाणे १२०० भूखंड शासकीय दरानुसार ए, बी,सी, या तीन ब्लॉकमध्ये किरायापत्र नोंदणी करून भूखंड वितरित केले होते. याप्रसंगी एक एप्रिल १९८८ ते ३१ मार्च २०१८ पर्यंत ३० वर्षाच्या लिजवर भाडेतत्वावर भूखंड देण्यात आले. यानुसार हे भूखंडधारक नियमित मालमत्ताकर, जलकर व इतर कराचा भरणा न. प. ला नियमित देणे सुरू होते.

आययुडीपी
दक्षिण मुख्यालयातर्फे लघुपट व चित्रकला ऑनलाइन स्पर्धा

नगर परिषद प्रशासनाने भूखंडधारकाकडून शासकीय दरानुसार घेतलेली रक्कम ही भूखंड कायमस्वरूपी करण्यासाठी संबंधित विभागाकडे भरणा करायचा होता. यानुसार भूखंड हे फेरफार करून भूखंडवासींना नगर परिषदेतर्फे मालकी हक्क देणे होते, तसेच हे भूखंड सर्वप्रथम नगर परिषदच्या नावाने फेरफार करीत जागा ताब्यात घेण्यासाठी नगर परिषदेला जिल्हा परिषदेकडे २३ लाख रुपयांचा भरणा करायचा होता. मात्र नगर परिषदेतर्फे फक्त आठ लाख रुपये भरण्यात आल्याची गुप्त माहिती आहे. वास्तविकता तत्कालीन नगर परिषद प्रशासनाने त्यावेळी आययुडीपी वासींकडून प्रति भूखंड घेतलेले १८०० रुपये जिल्हा परिषदचेच्या संबंधित विभागाकडे भरणाच केलेला नाही. त्यामुळे या आययुडीपी रहिवासी जागेचा मालकी हक्काचा ताबा नगर परिषदला देण्यात आलेला नाही. या जागेची लीज मुदत ३१ मार्च २०२८ ला संपली असून पुढील लीजच्या नूतनिकरणासाठी नगर परिषद प्रशासन समर्थ नसल्याचे लक्षात येते.

प्रशासनाच्या कचाट्यात आयुडीपीवासी

नगर परिषद हद्दीत येणाऱ्या प्रभाग क्र.१६ येथील आययुडीपी रहिवासींची नगर परिषदेद्वारे देण्यात आलेली ३० वर्षाची लीज ही ३१ मार्च २०१८ ला संपुष्टात आली. नुतनीकरणासाठी आययुडीपी येथील रहिवासींनी कामठी नगर परिषदेकडे अर्ज केले. मात्र नगर परिषद प्रशासनाच्या वतीने पूर्ववत दिलेली लीज चुकीच्या पद्ध्तीने देण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण देत पुढील लीज नुतनीकरनासाठी कामठी तहसीलच्या महसूल प्रशासनाला मोठी किंमत मोजून द्यावी लागेल. नगर परिषदेच्या हे अवाक्याबाहेर आहे. परिणामी कामठी नगर परिषद व महसूल प्रशासनाच्या कचाट्यात आयुडीपीवासी अडकले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com