‘निसर्ग’ वादळ आलं अन् मॉन्सूनच वार केरळात गेलं

अनुप ताले
Wednesday, 3 June 2020

पश्चिम किनाऱ्यावर निर्मित ‘निसर्ग’ नावाच्या वादळाची वाटचाल कोकण किनाऱ्याला समांतर होत असून, मुंबईजवळ धडकण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. परिणामतः संपूर्ण कोकण विभागात पुढील 24 तास वेगवान वाऱ्यासोबत जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. याच वादळाचा परिणाम पुणे विभागात दिसून येत असून, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता व सोलापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सद्यस्थितीत मराठवाडा विभागात बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी येथे गडगडाटासह मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. हा वादळाचा विस्तारित परिणाम दिसून येत आहे. या सोबत मुंबई, ठाणे, पालघर येथे सततधार तर, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यात विशेषतः पश्चिम भागात पाऊस उपस्थित राहणाचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत.

अकोला : आधी ॲम्फन आणि आता पश्चिम किनाऱ्यावर निर्मित ‘निसर्ग’ वादळाचा परिणाम म्हणून राज्यात व प्रामुख्याने विदर्भात मॉन्सूनचे आगमन लांबले आहे. सध्या मॉन्सून केरळमध्ये दाखल असून, विदर्भात त्याचे आगमन 12 जूननंतर होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

पश्चिम किनाऱ्यावर निर्मित ‘निसर्ग’ नावाच्या वादळाची वाटचाल कोकण किनाऱ्याला समांतर होत असून, मुंबईजवळ धडकण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. परिणामतः संपूर्ण कोकण विभागात पुढील 24 तास वेगवान वाऱ्यासोबत जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. याच वादळाचा परिणाम पुणे विभागात दिसून येत असून, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता व सोलापूर जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सद्यस्थितीत मराठवाडा विभागात बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी येथे गडगडाटासह मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे. हा वादळाचा विस्तारित परिणाम दिसून येत आहे. या सोबत मुंबई, ठाणे, पालघर येथे सततधार तर, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यात विशेषतः पश्चिम भागात पाऊस उपस्थित राहणाचे संकेत हवामान तज्ज्ञांनी दिले आहेत.

विदर्भात मॉन्सून 12 जून नंतर
सध्या विदर्भ आणि खान्देशमध्ये वातावरण ढगाळलेले असून, अल्प पावसाची चिन्हें दिसत आहेत. ही परिस्थिती ‘निसर्ग’ वादळाचा परिणाम आहे. काल हवामान विभागाने मॉन्सून केरळमध्ये दाखल झाल्याचं अधिकृतपणे जाहीर केलं आहे. मात्र विदर्भात मॉन्सून पोहचण्यासाठी 12 जूनपर्यंत वाट पाहावी लागू शकते.
- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर

वाऱ्याची दिशा
वादळाच्या क्षेत्रात हवेची दिशा चक्राकर असते. कोल्हापूर जिल्ह्यात ती साऊथ वेस्ट, सांगली, सोलापूर, सातारा जिल्ह्यामध्ये मुख्यतः दक्षिण, दक्षिण-पूर्व राहण्याची शक्यता आहे. हवेचा वेग ताशी 50 किमी पेक्षा अधिक असू शकतो.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Nisarg' storm will delay the monsoon