मंत्र्यांची जात दाखवून संविधानाचा अपमान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Raut Rahul Bondre press conference bjp disrespect of constitution

मंत्र्यांची जात दाखवून संविधानाचा अपमान

चिखली : ऊर्जामंत्री नितीन राऊत हे जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असताना त्यांना वीज वितरण कंपनीने रब्बी हंगामात वीज तोडणी केली म्हणून झालेल्या नुकसानीच्या निषेधार्थ शेतकर्‍यांनी काळे झेंडे दाखविले. त्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. याबाबत आ. महाले यांनी शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल केल्याचा निषेध केला म्हणून माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन ऊर्जामंत्री हे दलित समाजाचे म्हणून त्यांना काळे झेंडे दाखविले असा जो आरोप केला हा म्हणजे राहुल बोंद्रे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पवित्र संविधानाचा अपमान करीत असल्याचा आरोप पं.स. सभापती सिंधूताई तायडे व सर्जेराव जाधव प्रदेश उपाध्यक्ष भाजप अनुसूचित जाती मोर्चा यांनी ३ फेब्रुवारीला झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान केला आहे.

शेतकर्‍यांनी दाखविलेले काळे झेंडे हे नितीन राऊत या व्यक्ती विशेष यांना दाखविलेले नसून राज्याचे ऊर्जामंत्री म्हणून दाखविलेले असल्याने माजी आमदार राहुल बोंद्रे यांना शेतकर्‍यांनी दाखविलेल्या काळ्या झेंड्यात जातच कशी दिसली? असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. सरकारविरुद्ध असलेला असंतोष व्यक्त करण्यासाठी व न्याय हक्क मागण्यासाठी उपोषण, आंदोलन, धरणे, असहकार, सविनय कायदे भंग या लोकशाही मार्गासोबतच काळे झेंडे दाखविणे, खुर्चीला हार घालणे हे सुद्धा मार्ग आहेत. माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सर्वच्या सर्व तथाकथित नेत्यांनी आ. महाले या एक महिला असताना ही त्यांच्यावर खोटे व बिनबुडाचे आरोप करून त्यांना महिलांचे वर्चस्व सहन होत नसल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.

महिलांना सन्मानाची व बरोबरीची वागणूक न देता महिला म्हणून त्यांना हिनवणे, त्यांना सार्वजनिक अपमान व अवमान होईल असे कृत्य त्यांनी केलेले आहे. आ. महाले या मनुवादी असत्या तर माझ्यासारख्या अतिमागास व दलित महिलेला त्यांनी सभापती बनविलेच नसते असेही म्हणाल्या. यावेळी अ‍ॅड. दिलीप यंगड जिल्हा अध्यक्ष अनुसूचित जाती मोर्चा, यादवराव भालेराव माजी जिल्हा अध्यक्ष, राजू नाटेकर जिल्हा उपाध्यक्ष, विष्णू जोगदंडे सर, विजय नकवाल, सुरेश यंगड जिल्हा सरचिटणीस भाजप अनुसूचित जाती मोर्चा, सुशील शिनगारे, पंडितदादा देशमुख शहराध्यक्ष, डॉ.कृष्णकुमार सपकाळ तालुका अध्यक्ष, सिद्धेश्वर ठेंग, संतोष काळे तालुका अध्यक्ष युवा मोर्चा, भीमराव अंभोरे, बबन गवई, अशोक हतागळे, किरण गुढेकर जिल्हा सरचिटणीस, नीलेश पूर्वे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Nitin Raut Rahul Bondre Press Conference Bjp Disrespect Of Constitution

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top