आनंदाची बातमी : या जिल्ह्याच्या 53 कंटेन्मेंट झोनमध्ये 28 दिवसांत आढळला नाही एकही रुग्ण म्हणून आता...

containment zone in akola.jpg
containment zone in akola.jpg

अकोला : महानगरपालिका क्षेत्रात 7 एप्रिल रोजी पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बैदपुरा परिसरात आढळला होता. तेव्हापासून शहर व जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या वातावरणातही महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी आनंदाची बामती म्हणजे रविवारपर्यंत शहरातील तब्बल ५३ परिसर कोरोना मुक्त झाले आहे. गेल्या 28 दिवसांत येथे एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. त्यामुळे हे परिसर कंटेन्मेंट झोनमधून बाहेर काढण्यात आले आहे.

महानगरपालिका क्षेत्रातील 123 परिसरात 1192 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे हे क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. कंटेन्मेंट झोनमध्ये करावयाच्या उपाययोजना या परिसरात सुरू करण्यात आल्या होत्या. यातील पहिला कंटेन्मेंट झोन म्हणून नोंद झालेल्या बैदपुरा तब्बल 70 दिवसांनंतर कोरोना मुक्त झाला. त्यापाठोपाठ आता शहरातील एकूण 53 परिसरात गत 28 दिवसांमध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळा नाही. त्यामुळे हे सर्व परिसर मनपा प्रशासनाने शासनाच्या नियमाप्रमाणे कंटेन्मेंट झोन मुक्त केले आहेत.

आतापर्यंत कोरोना मुक्त झालेले परिसर
महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना मुक्त झालेल्या परिसरांमध्ये बैदपुरा, इनानदारपुरा भारतनगर, भोईपुरा, सिंधी कॅम्प, कृषीनगर, मेहरेनगर डाबकी रोड, सुधीर कॉलनीतील रवीनगर, शिवर, जयहिंद चौक, शंकरनगर-1 अकोट फैल, गुलजारपुरा आरपीटीएस रोड, शिवनी, अगरवेस राजपुरा, जुना आळशी प्लॉट, बापूनगर, रामनगर, म्हाडा कॉलनी, गंडकीनगर आपीटीएसरोड, आझाद कॉलनी, मोठी उमरी, खडकी, गोकुळ कॉलनी, जेतवननगर खदान, शास्त्रीनगर-1, अंसार कॉलनी, लक्कडगंज रोड, आनंदनगर दमाणी हॉस्पिटल, डाबकी गाव डाबकी रोड, गीतानगर, व्हीएचबी कॉलनी रतनलाल प्लॉट, नानकनगर निमवाडी, न्यू खेतानगर कौलखेड, जागृती विद्यालय रणपिसेनगर, देशमुख फैल, व्हीएचबी कॉलनी गौरक्षण रोड, ज्योतीनगर जठारपेठ, सोनटक्के प्लॉट-2 जुने शहर, महादेव मंदीर गोकुळ कॉलनी, गायत्रीनगर, लक्ष्मीनगर, पार्वतीनगर, मलकापूर चौक मेन रोड, पील कॉलनी मलकापूर, आरोग्यधाम कॉलनी मलकापूर, राउतवाडी, प्रमोद सॉल मील लक्कडगंज, इकबाल कॉलनी मोहता मील रोड, न्यू बैदपुरा, रणपिसेनगर-2, गाडेगाबाबा चाळ शिवाजी पार्क, माधननगर गौरक्षण रोड, पावसाळे ले-आऊट कौलखेड, शिवर-2 आदी परिसरांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com