esakal | पिकाला पोषक पाऊस पण, प्रकल्प तहानलेलेच
sakal

बोलून बातमी शोधा

पिकाला पोषक पाऊस पण, प्रकल्प तहानलेलेच

पिकाला पोषक पाऊस पण, प्रकल्प तहानलेलेच

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शरद येवले
मंगरुळपीर ः ‘ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा आणि पाऊस आला मोठा’, मंगरुळपीर तालुक्यात या म्हणीच्या उलट झाले असून, पावसाळा आला तरी दमदार पावसाळा झाला नाही. त्यामुळे तालुक्यात पाऊसच खोटा झाल्याचे सध्याची परिस्थिती आहे. १५ दिवसांपासून पाण्याने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. सोयाबीन, तूर पिकांना पाऊस हवा होता. गेल्या ३-४ दिवसात थोडा का होईना पण, पाऊस बरसल्याने शेतातील पिकांना नवसंजीवनी मिळाली असून, तालुक्यातील सर्वच लहान, मोठे प्रकल्प अजूनही ये रे ये रे पावसाचं करीत आहेत. (Nutritious rain to the crop but, the project is dry)


मंगरुळपीर तालुक्यात सध्या फक्त पिकांना पुरेसा होईल असाच पाऊस बरसला. मात्र, दमदार पाऊस होऊन नद्यांना पूर गेला, असा पाऊस संपूर्ण तालुक्यात कोठेच पडला नाही. सध्या जुलै सुरू आहे तरी अजूनपर्यंत तालुक्यातील प्रकल्पाच्या स्थितीमध्ये पाहिजे असा बदल झाला नाही. शेतकऱ्यांना खरीप हंगाम सध्यातरी बरा आहे. समोर अशीच परिस्थिती राहिली तर, रब्बी हंगामात चागलीच दमछाक होणार आहे. तालुक्यातील सर्वच १६ लघु व मध्यम प्रकल्पाची परिस्थिती सध्यातरी एवढी चागली नाही.

हेही वाचा: ताई तुम्हाला अश्वत्थामा बनवलं गेलंय, अमोल मिटकरींची पंकजा मुंडेंसाठी खास पोस्ट

तालुक्यात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी काही जास्त फरक नाही. तालुक्याला पाणी पुरवठा करणारा मोतसावंगा प्रकल्पाची पातळी अजूनही २५ टक्क्यांच्या खालीच आहे. त्यामुळे उन्हाळ्यात मंगरुळपीर तालुक्यासह ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागणार नाही एवढा तरी पाऊस होणे समोर गरजेचे आहे. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पाऊसाने हुलकावणी दिली व आता गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात पावसाने परत जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठकाणी प्रकल्प हाऊसफुल्ल झाले आहेत. मात्र, मंगरुळपीर तालुक्याव्यतिरिक्त इतर ठिकाणीच पाऊस बरसत असल्याने या तालुक्याला इंद्र देवताने त्यांच्या यादीतून वगळले काय, असा प्रश्‍न तालुक्यातील नागरिकांना पडला आहे.

ऑगस्टमध्ये दमदार पाऊस आला तर, शहरासह ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होईल. मात्र, सध्या पाण्याला जोर नसल्याने विहिरींची पातळी सुद्धा नाही तर प्रकल्पांचे दिवा स्वप्न पाहणे चुकीचे ठरेल. खरिपाच्या पिकांची स्थिती आतापर्यंतच्या पावसाने चांगली झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर आतापर्यंत झालेल्या पावसाने समाधानी असल्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, अजूनही आठवडाभरात दमदार पाऊस पडला नाही तर, पुढील काळात नागरिकांसह प्रशासनाच्या डोळ्यातून नक्कीच पाणी पडेल.

तालुक्यातील लघु, मध्यम प्रकल्प व पाण्याची पातळी
१२ जुलैपर्यंत मोतसावंगा २२.३५ टक्के, सारसी २.४९, चोरद प्रकल्पात ६.८० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे तर, उर्वरित प्रकल्पाची माहिती संबंधित विभागाकडे प्राप्त नाही.

Nutritious rain to the crop but, the project is dry

loading image