अकोला : जिल्ह्यात ओमायक्रॉन निर्बंध; सोहळ्यांत ५० जणांच्या उपस्थितीची अट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

omicron
अकोला : जिल्ह्यात ओमायक्रॉन निर्बंध; सोहळ्यांत ५० जणांच्या उपस्थितीची अट

अकोला : जिल्ह्यात ओमायक्रॉन निर्बंध; सोहळ्यांत ५० जणांच्या उपस्थितीची अट

अकोला : ओमायक्रॉन प्रकाराच्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाच्या आपत्‍ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाने ३० डिसेंबर रोजी सुधारित मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. या सूचना संपूर्ण जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता ३१ डिसेंबर पासून पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी शुक्रवारी (ता. ३१) निर्गमित केले आहेत. त्यानुसार कार्यक्रमांच्या आयोजनावर मर्यादा लावण्यात आल्या आहेत. (Omicron restrictions in the district Condition of attendance of 50 persons at ceremonies)

हेही वाचा: अकोला : विशेष सभेसाठी पुन्हा विरोधकांचे अध्यक्षांना पत्र

जबाबदारी निश्चित

कोविड नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्‍यक्‍तींवर, आस्‍थापनेवर दंडात्‍मक कारवाई करण्‍याबाबतचे दंड आकरणाची आदेश यापुढेही कायम राहतील. या बाबत काटेकारपणे तपासणी व अंमलबजावणी करण्‍याची जबाबदारी संबंधित अनुज्ञप्‍ती प्राधिकारी, आयुक्त महापालिका, जिल्हा पोलिस अधीक्षक, महसूल विभाग तसेच ग्रामीण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबधित नगर पालिका, नगर पंचायतीचे मुख्‍याधिकारी यांची राहील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.(corona restrictions )

हेही वाचा: माझी हत्या होऊ शकते, सुरक्षा द्या; ओवैसींचे लोकसभा अध्यक्षांना पत्र

असे आहेत नवीन निर्बंध

लग्‍नसोहळा व लग्‍न संमारंभाच्‍या बाबतीत, बंदिस्त जागा, हॉल, मेजवानी, मॅरेज हॉल इत्यादी तसेच खुल्‍या जागेकरिता उपस्थितांची मर्यादा ५० पेक्षा जास्‍त ठेवता येणार नाही.

इतर सामाजिक, राजकीय किंवा धार्मिक कार्ये आणि मेळाव्याच्या बाबतीत, जेथे उपस्थितांची उपस्थिती बंद जागेसाठी आणि खुल्या जागेसाठी ५० पेक्षा जास्‍त ठेवता येणार नाही.

अत्‍यंविधी करिता २० व्‍यक्‍ती मर्यादित राहतील.

जिल्ह्याच्‍या कोणत्याही भागात जी पर्यटन स्थळे आहेत किंवा इतर ठिकाणे आहेत जी मोठ्या प्रमाणात लोकांच्या गर्दीला आकर्षित करतात अशा सर्व प्रकारच्या सार्वजनिक स्‍थळी तसेच वाहतुकीच्या व कामाच्या ठिकाणी सामाजिक अंतरच्या नियमांचे पालन करण्यात यावे.

सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीमध्ये कमीत कमी सहा फुटाचे सुरक्षित अंतर राहील याची दक्षता घ्यावी. तसेच एकावेळी पाच पेक्षा जास्त जास्त लोक एकत्रित येणार नाही याची दक्षता घ्यावी. याबाबत आवश्‍यक तपासणी करुन स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल, पोलीस विभागांनी दंडात्मक कारवाई करावी.(akola news)

हेही वाचा: इस्लामपूर नगरपालिकेची ३ जानेवारीची सभा रद्दचे निर्देश!

  • शासकीय कार्यालयांमध्‍ये प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्‍मक लसीकरणाच्‍या दोन मात्रा केल्‍याबाबतचे प्रमाणपत्र सोबत ठेवणे बंधनकारक राहील. नसल्‍यास, आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल सोबत ठेवावा.

  • सर्व सावर्जनिक ठिकाणी वावरतांना तसेच शासकीय कार्यालयामध्‍ये येणाऱ्या नागरीकांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील.

  • कोणत्‍याही परिस्‍थितीत कोविड प्रतिबंधात्‍मक उपाययोजनांचे तसेच कोविड अनुरुप वर्तनाचे पालन केले जात आहे किंवा नाही याची खातरजमा करण्‍यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याला संबंधित आस्‍थापना यांनी तपासणीसाठी उपलब्‍ध करुन देणे आवश्‍यक राहील.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top