अकोला जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव!

दुबईतून १८ डिसेंबरला परतलेल्या युवतीला बाधा
Omicron variant
Omicron variantSakal media
Summary

दुबईतून १८ डिसेंबरला परतलेल्या युवतीला बाधा

अकोला : दुबई(dubai) येथून प्रवास करुन १८ डिसेंबर रोजी जिल्ह्यात(akola) परतलेल्या एका युवतीचा आरटीपीसीआर अहवाल कोरोना पॉझिटिव्ह (covid positive)आल्यानंतर आता सदर युवतीला ओमायक्रॉनची (omicron) बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर युवतीचे आरएनए सॅपल पुणे येथील प्रयोगशाळेतून रविवारी (ता. २६) पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हावासियांच्या चिंतेत भर पडली असली तर ओमायक्रॉन बाधित युवतीची तब्बेत मात्र स्थिर आहे.

Omicron variant
दोन जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं पाहायला मिळत असलं तरी, ओमायक्रॉननं हळूहळू डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. ओमायक्रॉनची(omicron) लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला असून विदेशातून आलेल्या नागरिकांनाच ओमायक्रॉनचा धोका अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात विदेशातून आलेल्या २३२ नागरिकांची यादी आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यापैकी १७४ जणांची माहिती आरोग्य विभागाला मिळालेली होती. त्यातील ४७ जणांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली होती व त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. दरम्यान दुबईतून परतलेल्या एका युवतीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता तिला कोरोनाच्या उत्परिवर्तीत ओमायक्रॉनची बाधा झाल्याचेही निष्पन्न झाले. त्यामुळे जिल्ह्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्याचे दिसून येत आहे.

हायरिक्समधील सर्व जण निगेटिव्ह

दुबई येथून प्रवास करुन जिल्ह्यात परतलेल्या युवतीच्या संपर्कातील चार ते पाच जण हायरिक्समधील असल्याने त्यांच्या स्वॅबची तपासणी यापूर्वीच आरोग्य विभागामार्फत करण्यात आली होती. त्याचे आरटीपीआर अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे युवतीपासून इतरांना ओमायक्रॉनची बाधा झाल्याची शक्यता धूसर आहे.

Omicron variant
वळसंग पोलिसांचे एकाच दिवसात दोन जुगार अड्ड्यांवर छापे; 13 जणांसह साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त 

युवतीची प्रकृती स्थिर

ओमायक्रॉनची पॉझिटिव्ह आढळल्या युवतीची तब्बेत सध्या स्थिर आहे. तिचा ऑक्सीजन स्तर सुद्धा सामान्य असून तिला कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. युवतीचा पुणे येथील अहवाल मिळाल्यानंतर तिच्या सोबत महापालिकेच्या आरोग्य विभागाने संपर्क करुन रुग्णालयात भरती होण्याचे सांगितले, परंतु कोणतेच लक्षण व त्रास नसल्याने युवतीने तुर्तास तरी रुग्णालयात भरती होण्यास नकार दिल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली आहे.

कोरोनामुळे एकाचा मृत्यू

कोरोनामुळे शनिवारी (ता. २५) एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण ६० वर्षीय पुरुष असून रोहणा, दहिहांडा येथील रहिवासी आहे. त्याना 18 डिसेंबर रोजी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान रविवारी (ता. २६) कोरोना तपासणीचे १४५ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी एक अहवाल पॉझिटिव्ह आला. सदर पॉझिटिव्ह रुग्ण पुरूष असून तो अकोला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहे.

Omicron variant
विशाल निकम ठरला 'बिग बॉस मराठी ३'चा महाविजेता

दुबई येथून जिल्ह्यात परतलेल्या युवतीला ओमायक्रॉनची बाधा झाल्याचा अहवाल पुणे येथून २६ डिसेंबर रोजी मिळाला. सध्या सदर युवतीची तब्बेत स्थिर आहे व तिच्या संपर्कातील इतर कोरोना निगेटिव्ह आहेत. त्यामुळे काळजी करण्यासारखे काही नसले तरी नागरिकांनी मात्र कोरोनाच्या नियमांचे पालक करावे.

- संजय खडसे , निवासी उपजिल्हाधिकारी, अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com