esakal | मनपा रुग्णालयात ऑक्सिजन टॅँकसाठी एक कोटीचा निधी
sakal

बोलून बातमी शोधा

मनपा रुग्णालयात ऑक्सिजन टॅँकसाठी एक कोटीचा निधी

मनपा रुग्णालयात ऑक्सिजन टॅँकसाठी एक कोटीचा निधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोरोना विषाणू संकट काळात रुग्णांसाठी प्राणवायू अर्थात ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरू आहे. यावर मार्ग काढण्यासाठी आमदार गोवर्धन शर्मा यांनी लिक्विड ऑक्सिजन टॅंक लावण्याकरिता एक कोटी रुपयांचा निधी स्थानिक विकास निधीतून आरोग्य विभागाकडे सुपूर्द केला आहे. या निधीतून महानगरपालिकेच्या रुग्णालय परिसरात ऑक्सिजन साठवून ठेवण्यासाठी टँँक उभारण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे आमदार शर्मा यांनी स्थानिक विकास निधी अंतर्गत टिळक रोडवरील मनपाच्या किसनाबाई रुग्णालय व डाबकी रोडवरील कस्तुरबा रुग्णालयात दहा टन लिक्विड ऑक्सिजन टँँक व रेमडेसिव्हिर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याकरिता हा निधी दिला आहे.

अकोला येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालय व व लेडींग हार्डिंग जिल्हा स्त्री रुग्णालय येथे ऑक्सिजन टँक आहेत. त्यतून रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. परंतु रुग्णांची वाढती संख्या पाहता व पाच जिल्ह्याचा भार अकोला जिल्ह्यावर येत असल्याने आमदार गोवर्धन शर्मा यांनी अकोला शहरातील रुग्णांना ऑक्सिजन कमी पडू नये या याकरिता एक कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

संपादन - विवेक मेतकर

loading image