esakal | पोळा बेतला जीवावर; बैल धुवायला गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू, तर दोघे गेले वाहून
sakal

बोलून बातमी शोधा

मृत मनोज मुरलीधर खांडे

पोळा बेतला जीवावर; बैल धुवायला गेलेल्या एका तरुणाचा मृत्यू, तर दोघे गेले वाहून

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : आज बैलांचा सण म्हणजेच पोळा (Pola celebration 2021) आहे. त्यानिमित्त आपल्या सर्जा-राजाच्या जोडीला धुवून, रंगवून सजविले जाते. त्यानंतर बैलांना पोळ्यात नेले जाते. मात्र, बैलांना पोळ्यात नेण्यापूर्वीच एका तरुणाचा मृत्यू झाला, तर दोन तरुण नदीत वाहून गेले आहेत.

हेही वाचा: अमरावतीत दोन मंत्री आमने-सामने, यशोमती ठाकूरही दाखल करणार अर्ज

दरवर्षीप्रमाणे शेतकऱ्यांचा कैवारी व अन्नदाता समजल्या जाणाऱ्या बैलांचा आज सण आहे. त्यानिमित्त दरवर्षी बैलांची पूजा करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ असते. आज दिनांक सहा सप्टेंबरला दुपारी दोन वाजताच्या सुमारास गावातील ब्रिटिशकालीन असलेल्या तलावात भव्य दिव्य असे पाणी असल्यामुळे गावातील नागरिकांनी बैल धुण्यासाठी पसंती दिली.

आगर गावातील मनोज मुरलीधर खांडे (वय 22) हा वयाचे वडील बैल धूत असताना अचानक पाण्याच्या प्रवाहात पाय घसरला. पाण्याचा अंदाज नसल्यामुळे मनोज खाडे या युवकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावातील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पाचपोर, प्रशांत सनगाळे, नितीन कोलटक्के, विनोद गव्हाळे, विजय पाचपोर, पंकज श्रीनाथ यांनी अथक प्रयत्न केले आणि तरुणाला बाहेर काढले. तत्काळ डॉक्टरांना दाखविण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. मृत अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा असून अत्यंत मनमिळावू स्वभावाचा असल्यामुळे त्याच्या मृत्यूमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, कानशिवणी येथील दोन तरुण पार्डी येथील काटेपुर्णा आणि पिंजर्डा नदीच्या संगमावर बैल धुवायला गेले होते. दोघेही काटेपुर्णा नदीत वाहून गेले. ग्रामस्थांना माहिती मिळताच त्यांनी नदीच्या दिशेने धाव घेतली. सध्या दोन्ही तरुणांचा शोध सुरू आहे.

loading image
go to top