आदेश घरपोच दारूचे अन् विक्री वाईनबारमधून

आदेश घरपोच दारूचे अन् विक्री वाईनबारमधून

देऊळगाव राजा (जि.बुलडाणा) : कोरोना प्रादुर्भाव (Corona Virus) पाहता जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे शहर व परिसरातील बिअर बार, वाइन बार मालकाकडून सर्रास आदेशाचे उल्लंघन होत आहे. यामुळे कोविड संसर्ग थांबविण्याच्या उपाययोजनांचा बोजवारा उडाला आहे. याकडे दारूबंदी विभाग व पोलिसांकडून हेतुपुरस्सर काणाडोळा केल्या जात असल्याने कोरोना प्रतिबंधक उपाययोजना निष्फळ ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. (Order for sale of home-made liquor at Buldana, sale from a wine bar)


कोविडचा वाढते संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाने देशी दारू, बिअर वाइन बार, सकाळी सात वाजेपासून सायंकाळी आठ वाजेपर्यंत ग्राहकांना घरपोच विदेशी दारू फक्त सीलबंद दारू पोचविण्याची परवानगी आहे.

आदेश घरपोच दारूचे अन् विक्री वाईनबारमधून
मुलानेच केला जन्मदात्या बापाचा खून

कोणत्याही परिस्थितीत थेट खरेदी पद्धतीने अथवा पार्सल पद्धतीने दुकानातून ग्राहकांना बिअर, वाइन, दारू विकता येणार नाही असे कडक आदेश असूनही स्थानिक बिअर बार, वाइन बार मालकाकडून सर्रास नियमांचे उल्लंघन केले जात आहे. ग्राहकांना केवळ घरपोच सेवा पुरविण्याचे निर्देश असताना सर्रास ऑन द स्पॉट बिअर बारवर दारू विक्री सुरू आहे.

आदेश घरपोच दारूचे अन् विक्री वाईनबारमधून
तेल्हारा; भांबेरी येथे वडील आणि मुलाची हत्या

शहराबाहेरून जाणारा राष्ट्रीय महामार्ग व शहरातून जाणार्‍या महामार्गावरील चार किलोमीटर अंतरा दरम्यान एकूण 40 बिअरबार सरकार मान्य आहे. यापैकी अनेक बिअरबार चालकांकडून जिल्हाधिकार्‍यांच्या माफत लागू केलेल्या टाळेबंदी आदेशाचे सर्रास उल्लंघन केल्या जात आहे. ऑन द स्पॉट बिअर बार वर मद्यपी लोकांची गर्दी होत असून सायंकाळच्या वेळी महामार्गावर असलेल्या अनेक बिअर बारवर तोबा गर्दी उसळत आहे.

आदेश घरपोच दारूचे अन् विक्री वाईनबारमधून
लॉकडाउनमध्ये दुकान उघडलं की कारवाई झाली म्हणून समजा

दोन दिवसापूर्वी एसपींच्या विशेष पथकाने बेकायदेशीर विदेशी दारू विक्री करीत असलेल्या एका हॉटेलवर छापा टाकून कायदेशीर कारवाई केली. मात्र, नियमांचे सर्रास उल्लंघन करणार्‍या बिअर बार कडे हेतुपुरस्सर काणाडोळा केला असा आरोप सर्वसामान्यांकडून केल्या जात आहे.

केवळ पार्सल सेवेचे फलक
पार्सल सुविधा उपलब्ध असे फलक अनेक बिअर बार समोर ठळक अक्षरात लिहिलेले आहे. मात्र, पार्सल सुविधेचा आपल्या पद्धतीने सोईस्कर अर्थ काढून ऑन द स्पॉट, टेक अवे सर्रासपणे विदेशी दारू विक्री सुरू आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशात स्पष्टपणे ग्राहकांना घरपोच पार्सल सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश असताना थेट काउंटर वरून विदेशी वाइन बिअर विक्रीचा फडा सर्रास अवलंबला गेला आहे.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com