उशिरा ताट वाढल्याने पतीने केला पत्नीवर हल्ला अन् न्यायालयाने सुनावली...

सकाळ वृत्तसेेवा
Thursday, 25 June 2020

पत्नी वेळेवर स्वयंपाक करत नाही व जेवायला देत नाही या कारणावरून पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला होता. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असून, पत्नीवर हल्ला करणाऱ्या पतीस मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

अकोला,  ः पत्नी वेळेवर स्वयंपाक करत नाही व जेवायला देत नाही या कारणावरून पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला होता. याप्रकरणी पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असून, पत्नीवर हल्ला करणाऱ्या पतीस मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

डॉ. पंजाबराव कृषी देशमुख विद्यापीठातील क्वॉर्टर्समध्ये रहिवासी असलेल्या राजेश वानखडे याने त्याची पत्नी अलका यांच्यासोबत जेवण उशिरा देत असल्याच्या कारणावरून सोमवारी दुपारी वाद घातला. या वादात पत्नीने त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता संतप्त झालेल्या राजेश वानखडे याने त्याची पत्नी अलका यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला.

यामध्ये गंभीर जखमी असलेली महिला घराच्या बाहेर येताच याच वेळी बोरगावमंजू पोलिसांचे वाहन राष्ट्रीय महामार्गावरून जात असतांना त्यांनी महिलेला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून तिचा पती राजेश वानखडे याला ताब्यात घेतले. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी या प्रकरणी राजेश वानखडे याच्याविरुद्ध सोमवारी रात्री उशिरा भादंविच्या कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला. आरोपीस अटक केल्यानंतर मंगळवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PCR to husband who fatally assaults wife akola marathi news