दहा दिवसात पेट्रोल सात रुपयांनी महागले

डिझेलही ६.५० रुपयांनी वाढले गॅस दरवाढ झाल्याने महागाईचा भडका आणखी उडणार
Petrol price gone up by Rs 7 ten days Diesel and Gas price hike akola
Petrol price gone up by Rs 7 ten days Diesel and Gas price hike akolasakal

अकोला : इंधन दरवाढीचा निर्णय मंगळवार, ता. २२ मार्च रोजी घेण्यात आला होता. तेव्हापासून दहा दिवसांत तब्बल नऊवेळा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. अकोल्यात या दहा दिवसांमध्ये पेट्रोलचे दर तब्बल सात रुपयांनी वाढले आहे. डिझेलच्या दरातही लिटरमागे ६.५० रुपयांनी वाढ नोंदविल्या गेली. पाच राज्यातील निवडणुकीनंतर इंधन दरवाढ करण्यात येणार असल्याची अपेक्षा खरी ठरल्यानंतर सातत्याने इंधनाच्या दरात वाढ होत आहे. पेट्रोल, डिझेलसह गॅस दरवाढ करण्यात आल्याने महागाईचा भडका आणखी उडणार आहे.

आधीच वाढलेल्या दरांमुळे नागरिक त्रस्त असताना त्यात आणखी दरवाढ झाल्याने नागरिकांचे बजेटच बिघडणार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया अकोलेकरांनी व्यक्त केला आहे.अकोला शहरात ता. २२ मार्चपासूनच इंधन दरवाढ लागू करण्यात आली आहे. शहर प्रथम पेट्रोल व डिझेलमध्ये प्रत्येकी ८४ पैसांची दरवाढ झाली होती. तब्बल १३७ दिवसांनंतर करण्यात आलेल्या या दरवाढीनंतर सलग १० दिवसांपासून दरवाढीला कोणताही ब्रेक लागलेला नाही. त्यामुळे दहादिवसांत पेट्रोलचे दर प्रती लिटर १०९.७४ रुपयांवरून ता. ३१ मार्च रोजी ११६.६२ रुपये झाले. या दिवसात एका लिटरमागे वाहनधारकांना एका लिटरमागे ६.६९ रुपये अधिक मोजावे लागत आहे. पेट्रोलसोबतच डिझेलच्या दरातही ९२.५८ रुपयांवरून ९९.१६ रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. ता. २२ ते ३१ मार्चपर्यंत डिझेलच्या दरात या दहा दिवसांमध्ये ६.५० रुपयांची वाढ नोंदविल्या गेली.

अशी झाली पेट्रोलची वाढ!

तारीख वाढलेले दर प्रती लिटर दर

२२ मार्च ०.८४ ११०.७७

२३ मार्च ०.८२ १११.५९

२४ मार्च ०.०० १११.५९

२५ मार्च ०.८५ ११२.४४

२६ मार्च ०.८३ ११३.२७

२७ मार्च ०.५१ ११३.७८

२८ मार्च ०.३३ ११४.११

२९ मार्च ०.८२ ११४.९३

३० मार्च ०.८५ ११५.७८

३१ मार्च ०.८४ ११६.६२

अशी झाली डिझेलची दरवाढ

तारीख वाढलेले दर प्रती लिटर दर

२२ मार्च ०.८४ ९३.५८

२३ मार्च ०.८३ ९४.४१

२४ मार्च ०.०० ९४.४१

२५ मार्च ०.८१ ९५.२२

२६ मार्च ०.८४ ९६.०६

२७ मार्च ०.५७ ९६.६३

२८ मार्च ०.३६ ९६.९९

२९ मार्च ०.७१ ९७.७०

३० मार्च ०.८३ ९८.५३

३१ मार्च ०.८४ ९९.३७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com