esakal | संभाव्या तिसऱ्या लाटेतही उद्योगाची चाके फिरती ठेवण्याचे नियोजन!
sakal

बोलून बातमी शोधा

संभाव्या तिसऱ्या लाटेतही उद्योगाची चाके फिरती ठेवण्याचे नियोजन!

संभाव्या तिसऱ्या लाटेतही उद्योगाची चाके फिरती ठेवण्याचे नियोजन!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला ः कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योगाची चाके कशी फिरती ठेवता येतील याबाबतचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी गुरुवारी (ता. १५) अकोला एमआयडीसी येथील उद्योजकांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली. (Planning to keep the wheels of the industry spinning even in the third wave!)

या संदर्भात उद्योजकांची मते विचारात घेण्याविषयी शासनाने निर्देश दिले आहेत. त्यादृष्टीने सदर बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता ए.बी. डाबेराव, अकोला इंडस्ट्रियल असोसिएशनचे निखिल अग्रवाल, नितीन बियाणी, मालू तसेच निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: Video: शेतकऱ्यांचा सामुहिक आत्महत्येचा इशारा; २० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

यावेळी किती उद्योग हे वर्क फ्रॉम होम या पद्धतीने चालविता येऊ शकतात? किती उद्योगांमध्ये कामगारांना राहण्या व भोजनाची व्यवस्था होऊ शकते, वाहतूक व्यवस्था, उद्योगांमधील उत्पादित मालाची आवश्यकता या दृष्टीने माहिती घेण्यात आली. या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे लसीकरणासाठी व्यवस्था करणे, तसेच कोविड सेंटर उभारणीचे नियोजन करणे या मुद्यांवरही चर्चा करण्यात आली.

संपादन - विवेक मेतकर

Planning to keep the wheels of the industry spinning even in the third wave!

loading image