PM Kisan Samman Yojana : अटींमुळे शेतकरी राहणार ‘सन्माना’पासून वंचित!

१४ व्या किस्तीच्या लाभासाठी तीन बाबींची पूर्तता आवश्यक
PM Kisan Samman Yojana Farmers will deprived due to conditions akola agriculture
PM Kisan Samman Yojana Farmers will deprived due to conditions akola agricultureesakal

अकोला : केंद्र शासनामार्फत लवकरच शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत लाभाची चौदावी किस्त जमा करण्यात येणार आहे. परंतु तत्वपूर्वी लाभार्थी शेतकऱ्यांची भूमी अभिलेख नोंदणी अद्यावत असणे, ई-केवायसी प्रमाणिकरण व बॅंक खाती आधार संलग्न करण्याचे केंद्र शासनाने बंधणकारक केले आहे.

या तीन बाबींची पूर्तता न केल्यास शेतकऱ्यांना १४व्या किस्तीचा लाभ देण्यात येणार नाही, असे शासनामार्फत स्पष्ट करण्यात आल्याने जिल्ह्यातील अनेक लाभार्थ्यांना चौदाव्या किस्तीच्या लाभापासून वंचित रहावे लागेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (पीएम-किसान) ही देशातील सिमांत तसेच अल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी लाभ देणारी सर्वात महत्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो.

PM Kisan Samman Yojana Farmers will deprived due to conditions akola agriculture
Farmer Protest : ‘शेतकऱ्यांचे मरण हेच शासनाचे धोरण...! शेतकऱ्यांचा रास्तारोको

शेतकऱ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरणाच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जात असल्याने शेतकऱ्यांना त्वरीत या पैशांचा वापरही करता येतो. सरकारने या योजनेचा लाभ देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न चालवला आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना स्वतःहून या योजनेत सहभाग घेण्यासाठी थेट नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यासाठी ‘पीएम किसान’ संकेतस्थळावर जावून लाभार्थ्यांना थेट अर्ज करता येतो. या सुविधेमुळे शेतकऱ्यांना कोणत्याही दलाल अथवा मध्यस्थाशिवाय एक रुपयाही खर्च न करता पंतप्रधान किसान सन्मान योजनेत आपले नाव नोंदवता येत आहे.

PM Kisan Samman Yojana Farmers will deprived due to conditions akola agriculture
Akola Riot : सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर! सर्व व्हॉटसअ‍ॅप ग्रुप अ‍ॅडमीन्सला नोटीस

आवश्यक बाबींची पूर्तता रखडलेले लाभार्थी

  • लॅंड सिडींग क्रमांक अद्ययावत करणे बाकी - २ हजार ३९२

  • ई-केवायसी प्रमाणिकरण रखडलेले शेतकरी - ५२ हजार ११७

  • आधार संलग्नीकरण बाकी असलेले - २०३६६

या बाबींची करावी लागणार पूर्तता

राज्याच्या भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे लॅंड सिडींग क्रमांक अद्ययावत करणे शासनाने आवश्यक केले आहे. त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांच्या आधारे शेतकऱ्यांना तहसिल कार्यालयात संपर्क साधावा लागेल. ही कार्यवाही पूर्ण करण्याची जबाबदारी तहसिलदार यांची असेल.

पीएम किसानसाठी ई-केवायसी प्रमाणिकरण करणे आवश्यक करण्यात आले आहे. ही प्रक्रिया स्वतः लाभार्थी शेतकऱ्याला करावी लागेल. त्यासाठी शेतकऱ्याला सीएससी केंद्र किंवा पीएम किसानच्या संकेतस्थळावर जावे लागेल.

१४व्या किस्तीसाठी लाभार्थ्याला बॅंक खाते आधार संलग्न करावे लागेल. त्यासाठी शेतकऱ्याला बॅंकेत जाऊन बॅंक खात्यात आधार संलग्न करावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com