अकोला : बुलेटवरून ‘हुल्लडबाजी’ करणाऱ्यांना पोलिसांनी शिकवला धडा

सायलेन्स झोनमध्ये फटाके फोडणाऱ्या १४ बुलेट जप्त
Akola Police seized 14 bullet
Akola Police seized 14 bulletsakal

अकोला : शहरात मोठ्या आवाजाच्या फटाके फोडणाऱ्या बुलेट चालविण्याची तरुणांमध्ये क्रेज आहे. बुलेटच्या सायलेन्सरमध्ये काही बदल केल्यानंतर गाडी रेस केली की फटाका फुटल्या सारखा आवाज येतो. बऱ्याच वेळेस रात्री अशा बुलेटमुळे आजारी व्यक्ती व जेष्ठ नागरिकांना त्रास होतो. अशा बुलेट चालकांविरोधात पोलिसांनी कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. मोहिमेअंतर्गत वाहतूक पोलिसांनी विविध रुग्णालय, शिकवणी क्लासेस तसेच सायलेन्स झोन भागात मोठ्या आवाजाचे सालेन्सर वापरून जोरदार फटाके फोडणाऱ्या १४ बुलेट जप्त केल्या. त्यामुळे बुलेट चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

महानगरातील मुख्य रस्त्यांवर तसेच नागरिकांची वस्ती असणाऱ्या भागात काही खोडकर वाहन चालकांनी मुख्यतः बुलेट वाहनात विचित्र प्रकारचे सायलेन्सर बसवून फटाके फोडण्याचे प्रकार वाढले आहेत. ज्यामुळे अशा वाहनांद्वारे रस्त्यांवर चालणारे वाहन चालक तसेच महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याच्या अनेक तक्रारी शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला येथे प्राप्त झाल्या आहेत.

त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक विलास पाटील, शहर वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या मार्गदर्शनात शहरातील विविध चौकांमध्ये नियुक्त पोलिस कर्मचारी दररोज बुलेट वाहन चालकांवर कारवाई करत आहेत. या मोहीमेत पोलिसांमार्फत सायलेन्सरद्वारे फटाके फोडणाऱ्या बुलेट वाहन तसेच विनापरवानगी वाहनात मोडिफिकेशन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुसार पोलिसांनी सायलेंन्स अर्थात नो-हॉर्न भागात सुद्धा बुलेट चालवून फटाके फोडणाऱ्या १४ बुलेट चालकांवर कारवाई केली. त्यामुळे बुलेट चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

जप्त केलेले सायलेन्स नष्ट

डुप्लिकेट सायलेन्सर लावलेल्या व मोठ्या आवाजात फटाके फोडून सर्वसामान्यांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना त्रास देणाऱ्या दुचाकींवर कार्यवाहीसाठी वाहतूक पाेलिसांनी गतवर्षी जवळपास तीन महिने माेहीम राबविली. ६० पेक्षा जास्त दुचाकी वाहतूक शाखेने जप्त केल्या हाेत्या. त्यानंतर जप्त केलेले फटाके फाेडणारे सायलेन्सर नष्ट करण्यात आले. दरम्यान आता पुन्हा पोलिसांनी बुलेट विरोधात मोहीम सुरू केल्याचे बुलेट चालकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com