मिटकरींना 'ते' वक्तव्य भोवणार? अकोल्यात तक्रार दाखल

एका विशिष्ट जाती व संविधानाचा अवमान केल्याचा ब्राह्मण महासंघाचा आरोप
amol mitkari
amol mitkariamol mitkari

अकोला : सांगली जिल्ह्यातील इस्लमापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर सभेत आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या व्यक्तव्याने एका विशिष्ट जाती व संविधानाचा अवमान केला असल्याची तक्रार अकोला येथील ब्राह्मण महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता.२१) सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनला केली.

आमदार मिटकरी यांनी हीन दर्जाचे तथ्यहीन, आधारहीन धार्मिक भावना भडकवणारे, धार्मिक मोरीती स्त्रोताचे अत्यंत अभद्र टिप्पणी करणारे व ब्राह्मण समाजाची मानहानी करणारे व अपमानित करणारे व्यंगात्मक भाषण केल्याचा आरोप ब्राह्मण महासंघातर्फे करण्यात आलेल्या पोलिस तक्रारीत केला आहे. या तक्रारीत त्यांनी आमदार अमोल मिटकरी यांनी ज्या स्त्रोताचा आधार घेतला त्या स्त्रोताचा अर्थही दिला आहे.

राज्याचे दोन कॅबिनेट दर्जाचे मंत्री उपस्थित असताना त्यांच्यापुढे एका विशिष्ट जातीला वारंवार अममानित करण्याचे काम आमदार अमोल मिटकरी यांनी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यांनी संविधानाची सुद्धा अपमान केल्याचे दिसून येत असल्याचे सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षकांच्या नावे देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ही तक्रार ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी उदयजी महा., विजयजी तिवारी, अमोलजी चिंचाळे यांनी दिली आहे. ही तक्रार देताना निलेश देव यांच्यासह महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com