esakal | भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीच्या निषेधार्थ आंदोलन
sakal

बोलून बातमी शोधा

Protest agitation of Mahavikas Aghadi on behalf of BJP in Akola

भाजपाच्या वतीने बाळापूर तालुक्यात विविध ठिकाणी दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. दुधाचा दर कमी करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या व घरगुती व व्यावसायिक प्रतिष्ठानाचे भरमसाठ विज आकारणी करुन ग्राहकांची लूट करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा जाहीर करण्यात आला.

भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीच्या निषेधार्थ आंदोलन

sakal_logo
By
अनिल दंदी

बाळापूर, (जि.अकोला) : भाजपाच्या वतीने बाळापूर तालुक्यात विविध ठिकाणी दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. दुधाचा दर कमी करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या व घरगुती व व्यावसायिक प्रतिष्ठानाचे भरमसाठ विज आकारणी करुन ग्राहकांची लूट करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा जाहीर करण्यात आला. 


 आज शनिवारी सकाळी आंदोलनाला सुरवात झाली. तालुक्यातील वाडेगाव, निंबा फाटा, पारस व रिधोरा येथे हे आंदोलन करण्यात आले. दुध खरेदी दर ३० रुपये करा, गाईच्या दुधाला सरसकट प्रतिलिटर १० रुपये व दुध पावडर निर्यातीला ५० रूपये अनुदान द्यावे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलनात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून बाळापूर व उरळ पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

जिल्हा सचिव विलास पोटे, तालुका सरचिटणीस संजय अघडते, जिल्हा सर्कल प्रमुख गजानन ढवळे, युवामोर्चा तालुका उपाध्यक्ष श्रीकृष्ण नागे, ओबीसी युवामोर्चा कार्यकारिणी सदस्य शिवाजी ठाकरे, जिल्हा युवामोर्चा सदस्य ज्ञानेश्वर खारोडे, शेख इम्रान, राजेश अघडते, काशीराम शेंडे, अमोल जाधव, रामा धांदे, पांडुरंग बढे, संदीप शेंडे, विठ्ठल शेंडे, सुरेन्द्र बोराखडे, राहूल मांगटे, अनंता हरणे, अमोल लव्हाळे, रतन गीरी, माधव मानकर, गणेश कंडारकर, सुनील मानकर, सुनील देशपांडे, सचिन बेलूरकर, मोहन भुस्कुटे, अनंता मानकर, जीवन गीरी, श्रीकृष्ण टाकळकर, रामदास लांडे, साहेबराव लांडे इत्यादी भाजपा कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
(संपादन - विवेक मेतकर)