esakal | Akola : दिवाळी आरक्षणाला ‘हाऊस फुल्ल’चा बोर्ड!
sakal

बोलून बातमी शोधा

Passenger Train

Akola : दिवाळी आरक्षणाला ‘हाऊस फुल्ल’चा बोर्ड!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला: दिवाळी सणाला अकोल्यातून पुण्या-मुंबईला जाणारे व पुण्‍या-मुंबईतून अकोल्यात सणासुदीसाठी येणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी असते. अनेकांच्या येण्या-जाण्याचे वेळापत्रक आधीच ठरले असते तर काहींचा बेत हा वेळेवर ठरतो. पूर्व नियोजित प्रवाशांनी प्रवासासाठी रेल्वेने आरक्षण करून घेतल्याने काही दिवसांतच दिवाळी काळातील आरक्षणासाठीचा हाऊस फुल्लचा बोर्ड लागला आहे. प्रतीक्षा यादी लांबलचक असल्याने वेळेवरचा बेत आखणाऱ्यांना आता खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे.

सणासुदीच्या काळात रेल्वेचे आरक्षण फुल असते, हा नेहमीचाच अनुभव आहे. त्यात दोन वर्षांपासून कोरोना संकटात मर्यादित स्वरुपात रेल्वे प्रवास होत असल्याने आरक्षणाची स्थिती अधिकच बिकट झाली आहे. नोव्हेंबरमध्ये दिवाळी असली तरी रेल्वेचे आरक्षण चार्ट दोन महिन्यांपूर्वीच फुल झाले आहे. मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये दिवाळीनंतरच्या दिवसांत प्रतीक्षा यादी असल्याचे आरक्षण चार्टवरून दिसून येत आहे. अमरावती-मुंबई या अंबानगरी गाडीत ता.७ नोव्हेंबर रोजी मुंबईसाठी ११३ वेटिंग आहे. मुंबई ते कोलकाता या मार्गावरील महत्त्वाच्या असलेल्या अकोला स्थानकावरून दररोज तब्बल ११२ एक्स्प्रेस गाड्यांची ये-जा सुरू आहे. मुंबई, पुणे महानगरांकडे जाणाऱ्या जवळपास सर्वच गाड्यांमध्ये शयनयान व वातानुकूलित श्रेणीच्या तिकिटांसाठी वेटिंगवर राहावे लागत आहे.

अशी आहे प्रतीक्षा यादी

०२११२ अमरावती - मुंबई - ११३ वेटिंग

०१०५२ हावडा - एलटीटी - ४५ वेटिंग

०२१०६ गोंदिया - मुंबई - २९ वेटिंग

०२२८० हावडा - पुणे - ९३ वेटिंग

०१०४० गोंदिया - कोल्हापूर - ६१ वेटिंग

loading image
go to top