
Ram Navami 2023 : शेगावात उत्सव, कार्यक्रमाची माहिती एका क्लिकवर
शेगाव : श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये श्री रामनवमी उत्सवास प्रारंभ झाला आहे. या उत्सवामध्ये गुढीपाडवा चैत्र शुद्ध १ ते चैत्र शुद्ध ९ पर्यंत दररोज धार्मिक प्रथा-परंपरेनुसार विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत.
यामध्ये दररोज पहाटे काकडा, सकाळी हरिभजन, दुपारी नामवंतांचे प्रवचन, संध्याकाळी हरिपाठ, रात्री कीर्तन अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होऊन कीर्तन, प्रवचन श्रवणाचा लाभ घेत आहेत. तसेच बुधवारी धनेश्वर बुवा ढोरे गोरेगाव,
गुरुवारी पंकज बुवा पाटील, भानगुरा यांचे किर्तन झाले असून, शुक्रवारी संजय बुवा ठाकरे, कौंडण्यपूर, शनिवारी पंकज बुवा पवार, पसरणी, रविवारी प्रकाशबुवा जंजिरे, पिंपळवाडी, सोमवारी बळीराम बुवा दौड, अकोला, मंगळवारी गोविंदबुवा चौधरी, केकत निंभोरा २९ मार्च रोजी गणेशबुवा हुंबाड महागाव, ३० मार्च रोजी श्रीरामबुवा ठाकूर, परभणी यांचे कीर्तन होईल. ३० मार्च रोजी मिती चैत्र शु. ९, गुरुवारी श्रीराम बुवा ठाकूर, परभणी यांचे सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत ''श्रीराम जन्मोत्सवा''चे कीर्तन होईल.
तसेच या उत्सवात अध्यात्म रामायण स्वाहाकारास मिती चैत्र शु. ५, रविवार, २६ मार्चला आरंभ होईल. रामनवमीच्या दिवशी चैत्र शु. ९. गुरुवार, ३० मार्चला सकाळी १० वाजता यागाची पूर्णाहुती व अवभृतस्नान होईल. दुपारी उत्सवाची रथ, अश्यासह पालखी परिक्रमा निघेल. ३१ मार्च रोजी मिती चैत्र शु. १०, शुक्रवारला संजयबुवा लहाने, करंजी यांचे सकाळी ६ ते ७ काल्याचे कीर्तन व नंतर दहीहंडी व गोपालकाला होईल.