कोरोनाचा धोका वाढताच, ६८० नवे पॉझिटिव्ह; ११ जणांचा मृत्यू

कोरोनाचा धोका वाढताच, ६८० नवे पॉझिटिव्ह; ११ जणांचा मृत्यू
कोरोनाचा धोका वाढताच, ६८० नवे पॉझिटिव्ह; ११ जणांचा मृत्यू

अकोला : कोरोना (corona virus) संसर्गामुळे जिल्ह्यात गुरुवारी (ता. ६) ११ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यासोबतच ६८० नवे रुग्ण आढळले. याव्यतिरिक्त ४५९ जणांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला. त्यामुळे सद्या जिल्ह्यात ६ हजार १८७ ॲक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. risk of corona increases

कोरोना संसर्ग तपासणीचे गुरुवारी (ता. ६) २ हजार ७१७ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २ हजार २०९ अहवाल निगेटिव्ह तर ५०८ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यासोबतच रॅपिडच्या चाचणीत १७२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण ८७० नव्या रुग्णांची भर पडली. मूर्तिजापूरमध्ये ५९, अकोट-११, बाळापूर-५०, तेल्हारा-२८, बार्शीटाकळी-२६, पातूर-४४, अकोला ग्रामीणमध्ये ७५ तर अकोला मनपा क्षेत्रात २१५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले.

कोरोनाचा धोका वाढताच, ६८० नवे पॉझिटिव्ह; ११ जणांचा मृत्यू
पत्नी आणि मुलीच्या मृत्यूनंतर ज्येष्ठ आंबेडकरी नेते प्रा. मुकुंद खैरें यांचे कोरोनामुळे निधन

असे आहेत मृतक

बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय पुरुष. पातूर येथील ७० वर्षीय पुरुष. बाळापूर येथील ४५ वर्षीय महिला. जवाहर नगर येथील ५० वर्षीय पुरुष. निंबी ता. बार्शीटाकळी येथील ६८ वर्षीय पुरुष. बाबुळगाव ता. तेल्हारा येथील ४५ वर्षीय महिला. सौदांळा ता. तेल्हारा येथील ६२ वर्षीय पुरुष. रामटेकपूर ता.अकोट येथील ४५ वर्षीय महिला. कोथाली खु. ता.बार्शीटाकळी येथील ९० वर्षीय पुरुष. कौलखेड येथील ६२ वर्षीय पुरुषाला ५ रोजी मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते. मुंडगाव ता. अकोट येथील ३० वर्षीय महिला.

कोरोनाचा धोका वाढताच, ६८० नवे पॉझिटिव्ह; ११ जणांचा मृत्यू
सुलतानपुर येथील भारतीय सैनिकाचा कर्तव्यावर असताना राजस्थान येथे मुत्यू

कोरोनाची सद्यस्थिती

- एकूण पॉझिटिव्ह - ४३८०१

- मयत - ७५४

- डिस्चार्ज - ३६८६०

- ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह - ६१८७

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com