लाच घेताना सरपंच व पतीस पकडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bribe

लाच घेताना सरपंच व पतीस पकडले

शिरपूर जैन - मालेगाव तालुक्यातील शिरपूर पासून जवळच असलेल्या खंडाळा शिंदे येथील सरपंच व तिचा पती यांनी कंत्राटदाराने केलेल्या कामाची पाच टक्के कमिशन म्हणून चौदा हजाराची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधित विभागाने रंगेहात पकडले. त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

खंडाळा शिंदे येथील सरपंच रंजना भास्कर खिल्लारे व तिचा पती भास्कर चिंनकु खिल्लारे यांनी कंत्राटदाराला त्याने केलेल्या कामाच्या बिलातील पाच टक्के कमिशन म्हणून १४ हजार रुपयांची लाचेची मागणी केली, ही लाच सरपंच व तिच्या पतीने त्यांचे राहते घरी खंडाळा येथे दि ३१ जुलै रोजी स्वीकारली. दोन्ही आरोपींना लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडून ताब्यात घेतले. दोघांनाही शिरपूर पोलिस स्टेशनमध्ये आणून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

सदर कारवाईमुळे परिसरातील शासकीय कामात लाच मागणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. सदर कारवाई विशाल गायकवाड पोलिस अधीक्षक ला. प्र.वी. यांच्या मार्गदर्शनामध्ये अरुण सावंत अप्पर पोलीस अधीक्षक, देविदास घेवारे अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती, गजानन शेळके पोलीस उपाधीक्षक वाशीम, सापळा व तपास अधिकारी सुजित कांबळे पोलीस निरीक्षक ला.प्र.वी. वाशीम व इतर कर्मचारी यांनी जबाबदारी पार पाडली. लाचलुचपत विभागाकडून कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणते शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लुचपत प्रतिबंधित विभाग वाशिम यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

Web Title: Sarpanch And Husband Caught While Taking Bribe From Khandala Shinde In Malegaon Taluk

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..