लोणार एसबीआयला प्रशासनाचा दणका

बँकामध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे.
state bank of india
state bank of indiasakal

लोणार : जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यापासून कोरोना बधितांचा आकडा वाढतीवर आहे. परंतु, याबाबत नागरिक सतर्क नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. विशेष म्हणजे शासकीय कार्यालय आणि बँकामध्ये नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. परंतु आता प्रशासन या विषयी ॲक्शन मोडवर आले आहे. लोणार तहसीलदार सैपन नदाफ येथील भारतीय स्टेट बँक(SBI)भेटीदरम्यान नियमांचे उल्लंघन होत असल्याप्रकरणी बँकेला पाच हजाराचा दंड 17 जानेवारी रोजी आकारला आहे.कोरोनाचा(corona) जिल्ह्यातील वाढता आकडा पाहता प्रशासनाने निर्बंध लावले आहेत. मास परिधान न करणे, शारीरिक अंतर न राखणे व गर्दीच्या ठिकाणी नियमाचे उल्लंघन प्रकरणी सर्वसामान्य तसेच व्यवसायिकांवर आतापर्यंत जिल्ह्यात कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, लोणार तहसीलदार सैपन नदाफ व कर्मचाऱ्यांनी अचानक भारतीय स्टेट बँकेला भेट दिली.

state bank of india
बेशिस्त वाहनांवर आजपासून कारवाई! जागेवर दंड न भरल्यास वाहन जमा

यावेळी त्यांना बँक कर्मचारी तसेच बँकेत उपस्थित असलेल्या नागरिकांनी मास्क परिधान न करणे, सुरक्षीत अंतर न ठेवणे, सॅनिटायझरची व्यवस्था नसणे तसेच शासनाने कोरोना संसर्ग पाहता लावलेल्या निर्बंधाची काटेकोरपणे पालन न करणे आधी उणिवा आढळून आल्या. याप्रकरणी बँक प्रशासनाला कोरोना नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देत पाच हजार रुपयांचा दंड आकारला.आतापर्यंत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अनेकांवर कार्यवाही करण्यात आली आहे. परंतु शासकीय कार्यालये तसेच बँकांमध्ये होणाऱ्या गर्दी विषयक सर्रास दुर्लक्ष करण्यात येत आहे. परंतु लोणार येथील कारवाई नंतर आता प्रशासनाकडून नियमांच्या अंमलबजावणीकडे लक्ष देत शासकीय कार्यालये तसेच बँकांची झाडाझडती घेतली जाणार असल्याचे सुतोवाच दिले आहे.

state bank of india
नाशिक : वर्षभरात १११ विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचे मृत्यू

कारवाईचे सर्वत्र कौतुकलोणार येथे तहसील प्रशासनाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंबर कसली आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या कारवाईमुळे प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.शहर तसेच तालुक्यातील नागरिकांनी कोरोना विषयक सुरक्षितेचे नियम काटेकोरपणे पाळावे. संस्था, शासकीय कार्यालय, सर्व बँका, शैक्षणिक संस्था यांनी कोरूना नियमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अन्यथा त्यांच्या विषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

- सैपन नदाफ, तहसीलदार, लोणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com