अकोला : एसटीच्या बडतर्फे १०२ कर्मचाऱ्यांचे कारवाईला आव्हान

न्यायालयाने दिलेल्या अल्टिमेटला दोन दिवस शिल्लक असताना, बुधवारी (ता.२०) १०२ कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्यासाठी अपिल दाखल
ST strike update 102 Appeal for resumption of work by action taken employees akola
ST strike update 102 Appeal for resumption of work by action taken employees akolasakal

अकोला : संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना ता. २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेशे न्यायालयाने दिल्यावर संपकीर कर्मचाऱ्यांकडून संबंधित विभागाकडे कामावर रुजू होण्यासाठी अपिल करत असतानाही बडतर्फच्या कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांनी अपिल केली नव्हती. परंतु, न्यायालयाने दिलेल्या अल्टिमेटला दोन दिवस शिल्लक असताना, बुधवारी (ता.२०) १०२ कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्यासाठी अपिल दाखल केली आहे.

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांकडून गत वर्षी ऑक्टोबरपासून कामबंद आंदोलन छेडण्यात आले. पाहता-पाहता हे आंदोलन पाच महिने चालले, तरी देखील एसटीचे राज्यात विलीनीकरण झाले नाही, मात्र त्यांना राज्य कर्मचारी इतकेच वेतनवाढ व इतर सुविधा मान्य करून मुंबई उच्च न्यायालयाने संप मिटवून ता. २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाचे आदेश धडकताच अनेक कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे अपिल दाखल केली होती. वैद्यकीय तपासणी करून त्या कर्मचाऱ्यांना कामावर रुजूही केले आहे. परंतु, कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांनी अपिल दाखल केली नव्हती. न्यायालयाने दिलेल्या अल्टिमेटला दोनच दिवस शिल्लक असताना १०२ कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होण्यासाठी अपिल केली आहे. कर्मचाऱ्यांची संख्या

आगार एक :४५

आगार दोन : ३२

विभागीय कार्यालय :२५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com