तेल्हारा पालिकेची प्रभाग रचना जाहीर

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगरपरिषदेत ता. १० मार्च रोजी प्रभाग रचना संदर्भात नकाशा जाहीर
Telhara Municipality Ward structure announced
Telhara Municipality Ward structure announcedsakal

तेल्हारा : ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालय, राज्य शासन व निवडणूक आयोगाचे मते मतांतर सुरू असतानाच राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ठरल्याप्रमाणे ता. १० मार्च रोजी स्थानिक नगरपरिषदेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नगरपरिषदेत ता. १० मार्च रोजी प्रभाग रचना संदर्भात नकाशा जाहीर करून प्रभाग रचना जाहीर झाली. यापूर्वी आठ प्रभागांमध्ये १७ सदस्य संख्या होती. त्यानंतर राज्य शासनाच्या निर्देशानुसार २० सदस्य संख्या झाल्यामुळे नगरपरिषदेत दहा प्रभाग झाले आहेत.

२०११ च्या जनगणनेनुसार नगरपरिषदेत २१ हजार २५९ लोकसंख्या गृहीत धरून प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. लोकसंख्येच्या अनुसरून मतदार संख्या ठरवल्या जाणार आहे. प्रभाग रचने संदर्भात हरकती घेण्याची ता. १० मार्च ते १७ मार्चपर्यंत मुदत राहणार असून, ता. २२ मार्च रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. ता. १ एप्रिल रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यामुळे नगरपरिषदेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण राज्य शासनाने निवडणूक आयोगाचे काही अधिकार काढून घेण्यासंदर्भात अध्यादेश जाहीर केला असताना सुद्धा निवडणूक आयोगाने आपले काम सुरू ठेवल्यामुळे आता निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काम करणार आहे की, राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com