एसटी संपाची कोंडी कायम; पुन्हा बसवर दगडफेक! | Akola news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akola

एसटी संपाची कोंडी कायम; पुन्हा बसवर दगडफेक!

बाळापूर : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची कोंडी कायमच आहे.(st workers protest) अकोला शहरातून(akola city) केवळ नऊ बस जळपासच्या शहरांसाठी धावत आहे. त्यातही बसवर दगडफेकीच्या घटना घडत आहे. शेगाव जाणाऱ्या बसवर दुसऱ्यांना दगडफेक झाली आहे. यामधे बसची काच फुटली आहे. हल्लेखोर पसार झाले आहेत.अकोला आगाराची बस क्रमांक एम एच ४० वाय ५८०८ ही बस शुक्रवारी नऊ प्रवासी घेऊन अकोल्याहून शेगावकडे जाण्यासाठी बाळापूरमार्गे निघाली होती. मात्र, राष्ट्रीय महामार्गावरील शेळद फाट्यानजीक दोन अज्ञातांनी बसवर दगडफेक करून काच फोडली. दगडफेक करून हल्लेखोर पसार झाले आहेत. चालकाने या घटनेची माहिती तातडीने आगार प्रमुखांना देत बस थेट बाळापूर पोलिस ठाण्यात नेली. दगडफेकीमुळे प्रवासी घाबरून गेले आणि त्यांनी आरडा-ओरड सुरू केली. बसवर दगडफेक करून दोन्ही हल्लेखोर पसार झाले आहेत. या हल्ल्यात प्रवासी सुखरूप आहेत. (attack on st bus in balapur akola)

हेही वाचा: देव देव्हाऱ्यात नाही देव नाही दिवालयी!

एकाच मार्गावर दुसऱ्यांदा हल्ला

अकोला आगार क्रमांक दोन वरून तब्बल ४९ दिवसानंतर शेगावकरिता मार्गस्थ झालेल्या एसटी बसवर रिधोरा जवळ अज्ञातांनी दगडफेक(attack on st bus) केल्याची घटना ता.२३ डिसेंबर रोजी घडली होती. आज पुन्हा याच मार्गावर शेळद नजीक एसटी बसवर हल्ला झाला आहे. बसवर हल्ले होत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: जळगावातील प्रमुख रस्त्यांचे उजळणार भाग्य

अकोल्यात नऊ बस धावतायेत

अकोला शहरात दोन बस स्थानक आहे.(akola bus depo ) त्यापैकी जुन्या बस स्थानकातून सध्या एकही बस धावत नाही. नवीन बस स्थानकावरून नऊ बस दररोज जवळच्या शहरांमध्ये धावत आहेत. अमरावतीकरिता चार, अकोट व शेगावकरिता प्रत्येकी दोन व मंगरुळपीरकरिता एक बस दररोज नवीन बस स्थानकावरून सोडली जात आहे.

हेही वाचा: अकोला : आर्थिक मदतीसाठी २५ जानेवारीपर्यंत अर्ज करा!

कर्मचाऱ्यांना हल्लेखोरांची भीती

राज्य शासनात एसटी महामंडळाचे विलीनीकरण(st bus strike) करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कामगारांचा संप सुरू आहे. सरकार वारंवार संप मागे घेण्याचे आवाहन करत असताना कामगार मात्र मागण्यांवर ठाम आहेत. काही कामगारांचे निलंबन तर काहींना बडतर्फ करण्यात आले असून काही कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(sharad pawar) यांनी आवाहन केल्यानंतर अनेक संघटनांनी संपातून माघार घेतली आहे, तर काही संघटना अद्यापही संपावर ठाम आहेत. अनेक आगारातून कमी अधिक प्रमाणात बससेवा सुरू झाली असली तरी एसटी बसवर हल्ले होत असल्याच्या घटना देखील घडत आहेत. त्यामुळे एसटीचे कर्मचारी भयभीत झाले आहेत.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top