Video: अकोला जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी; पेरणीची घाई नको!

Strong attendance in Akola district; Chance of heavy rain
Strong attendance in Akola district; Chance of heavy rain

अकोला : राज्यात मॉन्सून सक्रिय होण्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती झाली असून, अकोला जिल्ह्यासह विदर्भात यापुढे गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. अकोल्यात गुरुवारी पडलेला पाऊस हा मॉन्सूनचाच असल्याने शेतकरी सुद्धा पेरणीसाठी सज्ज झाले असले तर पेरणीची घाई नको. जोपर्यंत पुरेशा पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणीची प्रतीक्षा करावी, असा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.


यंदा मॉन्सूनचे आगमन जूनच्या पहिल्या आठवड्यातच होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले होते. परंतु, मध्यंतरी समुद्रात दोन वादळ निर्माण झाल्याने, मॉन्सूनचे आगमन लांबले आणि अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

स्थानिक आर्द्रता व वातवरण बदलानुसार तसेच नुकतेच येऊन गेलेल्या ‘निसर्ग’ वादळाच्या परिणामामुळे जिल्ह्यासह विदर्भात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. परंतु, गेल्या १२ दिवसात केवळ ३५.७ टक्केच पावसाची नोंद झाल्याने, शेतकरी चिंतेत पडले होते. परंतु, आता राज्यात मॉन्सून सक्रिय झाला असून, अकोल्यासह विदर्भात जोरदार पावसाचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.


बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘कमी दाबाचे क्षेत्र’ ओरिसा किनाऱ्यावर सक्रिय असून, त्याचा प्रवास जमिनीकडे होताना दिसत आहे. ही मॉन्सून सक्रिय होण्याकरिता पूरक परिस्थिती आहे. यामुळे आज विदर्भ आणि मराठवाडा विभागात मध्यम स्वरूपात पाऊस येऊ शकतो. राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये आर्द्रता ५० ते ८० टक्क्यांपर्यंत वाढलेली दिसून येत आहे. त्यानुसार कोकण सोबतच नाशिक विभाग, मराठवाडा, विदर्भ, पुणे विभागातील सर्व जिल्ह्यात गडगडाटासह पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
- संजय अप्तुरकर, हवामान तज्ज्ञ, नागपूर
 

तालुका जिल्ह्यात १२ जूनपर्यंत
पडलेला पाऊस
१२ जूनपर्यंतचा पाऊस
वार्षिक टक्केवारी
अकोला ३४.१ ४.७
बार्शीटाकळी ७५.४ ११.३
अकोट २४.३ ३.६
तेल्हारा २९.० ४.३
बाळापूर ३९.१ ६.०
पातूर ००.० ०.०
मूर्तिजापूर ४८.४ ६.५

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com