बुलडाणा जिल्ह्यात रेमडिसिव्हरसाठी संषर्घ

इंजेक्शन उपलब्धतेसाठी पक्ष, संघटना रस्त्यावर
corona
coronafile photo


चिखली (जि.बुलडाणा) : तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून धनदांडग्यांसह सर्वसामान्य पॉझिटिव्ह रुग्णांच्या इलाजासाठी रेमडीसीवीर इंजेक्शनची प्रचंड मागणी करीत आहे.

यामध्ये काळाबाजार होत असल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाइकांनी दिल्याने शिवसेना, रयतक्रांती, स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी एकत्र येत जिल्ह्यातील मेडीकलची झाडाझडती करण्याची मोहीम हाती घेतली. रुग्णांची हेळसांड होत असल्याने चिखली शहरातील एका मेडीकलवरील कर्मचार्‍यास चोप सुद्धा देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.


रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना रेमडीसीवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती असून असे असताना धनदांडग्यांना रेमडीसीवीर इंजेक्शन मिळत आहे. ते अव्वाच्या सव्वा रक्कम मोजून मिळवूही शकतात. परंतु, गोरगरीब रुग्णांना यासाठी बुलडाणा,जालना, औरंगाबाद, अकोला येथे पळापळ करावयाचे चित्र पहावयास मिळत आहे असे असताना इंजेक्शन वेळेवर मिळत नसल्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी येत असून विविध पक्षांच्या नेत्यांकडे असंख्य तक्रारी प्राप्त होत आहे.

चिखली येथे बुलडाणा येथील एजन्सीकडून रेमडीसिव्हीयर इंजेक्शन उपलब्ध झाल्याची माहिती नातेवाइकांना दिली व संबंधित मेडीकलवरती पाठवले परंतु काही मेडिकलधारकांनी इंजेक्शन उपलब्धच नसल्याचे सांगितल्याने रुग्णांच्या नातेवाइकांनी याची माहिती शिवसेनेचे कपिल खेडेकर, रयतचे प्रशांत ढोरे, मनसेचे प्रवीण महाडीक, स्वाभिमानीचे विनायक सरनाईक, नितीन राजपूत यांना दिल्याने याची शहानिशा करण्यात आली. परंतु, इंजेक्शन नाही असे सांगण्यात आले.

यावेळी कार्यकर्ते व रुग्णांच्या नातेवाइकांसह सहकार्‍यांनी मेडिकल कर्मचार्‍यास चोप दिल्याने रेमडीसीवीर मिळाल्याने ते इंजेक्शन गरजू रुग्णांना मिळाले. यापुढे कुणी एजन्सीधारक जर मर्जीतील लोकांना मनमानी पुरवठा करत असेल मर्जीतील मेडिकल धारकांना इंजेक्शन देऊन पैसे कमावण्याचा प्रयत्न करू पाहत असेल तर याचा शोध घेऊन त्यासही चोप देऊ असा इशारा कपिल खेडेकर व प्रशांत ढोरे ,विनायक सरनाईक यांनी दिला असून यावेळी प्रवीण महाडीक, रवी पेटकर, आशिष महाडीक, जितू राजपूत, बंटी लोखंडे, शेख अजीम, मंगेश ठेंग आदींसह बहुसंख्य रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.

इंजेक्शनचा मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी
कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत असल्याने खासगी दवाखान्यावर सुद्धा ताण आल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. त्यातच अधिक सिरीयस रुग्ण असल्यामुळे त्यांना हे रेमडीसिवीर इंजेक्शन देणे आवश्यक असले तरी त्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याची माहिती समोर येत असून प्रशासनाने रेमडीसिवीर इंजेक्शनचा पुरवठा वाढविणे अतिआवश्यक झाले आहे. अन्यथा रूग्णांसह कोरोना रुग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांनासुद्धा याचा नाहक त्रास सहन करावा लागू शकत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

संपादन - विवेक मेतकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com