सीबीएसई बारावी परीक्षेत अकोल्यातील विद्यार्थी चमकले 

विवेक मेतकर
सोमवार, 13 जुलै 2020

सीबीएसई इयत्ता बारावीचा निकाल सोमवार, ता. 13 जुलै रोजी दुपारी घोषित झाला आहे. प्रभात सिनिअर सेकंडरी स्कूलचा निकाल 100 टक्के लागला असून, समीक्षा मोडकने सर्वाधिक 95.2 टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर स्कूल ऑफ स्कॉलरच्या स्वराली कुळकर्णीने 91.20 टक्के गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे.

अकोला : सीबीएसई इयत्ता बारावीचा निकाल सोमवार, ता. 13 जुलै रोजी दुपारी घोषित झाला आहे. प्रभात सिनिअर सेकंडरी स्कूलचा निकाल 100 टक्के लागला असून, समीक्षा मोडकने सर्वाधिक 95.2 टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर स्कूल ऑफ स्कॉलरच्या स्वराली कुळकर्णीने 91.20 टक्के गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे.

सीबीएसई इयत्ता बारावीच्या परीक्षेत प्रभात किड्‌सच्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे आचल काळपांडे, गायत्री राणे, मुस्कान गुप्ता, ओम आगरकर, ओम बढे, प्रतिक करंगळे, पूर्वी निंबाळकर, रोहन सरदार, संकेत गवई, श्रेयस वानखडे, तमजीद खान, वैष्णवी नळकांडे आणि यश वानखडे यांनी "ए-' ग्रेड प्राप्त केला आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

पूर्वी निंबाळकर 93.60 टक्के गुण घेऊन दुसऱ्या क्रमांकावर आहे तर आचल काळपांडे 92.60 टक्के गुण घेऊन तिसरी आली आहे. तसेच 21 विद्यार्थी ए- ग्रेड घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे व वंदना नारे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

.बघा किती टक्‍क्‍यांनी वाढला सीबीएसई बारावीचा निकाल....

आंचल बोर्डातून प्रथम
आचल काळपांडे या विद्यार्थीनीने फिजीकल या विषयात 100 पैकी 100 गुण घेऊन बोर्डातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. प्रभात किड्‌स स्कूलची सीबीएसई उच्चमाध्यमिक इयत्ता बारावीची ही दुसरी बॅच असून, प्रभातच्या एकूण 42 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.

सीबीएसईच्या बारावीच्या निकालात मुलींची बाजी; तब्बल दोन लाख विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण... 

स्कूल ऑफ स्कॉलरची स्वराली प्रथम
 Image may contain: 1 person, glasses and close-upसीबीएसई बाराबी परीक्षेत स्कूल ऑफ स्कॉलरच्या स्वराली कुळकर्णीने 91.20 टक्के गुण मिळवून प्रथम येण्याचा मान मिळविला. आदित्य देवकरने 88.80 टक्के गुण मिळवित दुसरा क्रमांक पटकाविला. हृतिक बागडेने 86.40 तर प्रेरणा राठोडने 84.20 गुण प्राप्त केले. शाळेतील 30 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 24 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर एक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला. यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा प्रशासनाने कौतुक केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students from Akola shine in CBSE XII exams